Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

संत आणि महर्षि यांच्या आशीर्वादामुळे अन् त्यांनी सांगितलेले विधी केल्यामुळे पुनर्जन्म प्राप्त झालेली ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
    २२.१०.२०१६ या दिवशी कु. दीपाली मतकर यांना डेंग्यू, न्यूमोनिया आणि कावीळ, असे विविध गंभीर आजार झाले. त्या वेळी त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवण्यात करण्यात आले. त्यांच्या आजारपणाचा घटनाक्रम, त्या गंभीर आजारातून बर्‍या होण्यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले उपाय, भृगु महर्षींनी श्री. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून सांगितलेले उपाय आणि देव भक्ताला काळाच्या दाढेतून कसे वाचवतो, याच्या साधकांनी घेतलेल्या अनुभूती आपण २८ नोव्हेंबरपासून क्रमश: लेखांत पाहिल्या. आजच्या लेखात कृतज्ञताभाव तसेच संतांनी कु. दीपाली यांना उपाय सांगितले याविषयी आज पाहूया.
     संत आणि महर्षी यांनी कु. दीपाली मतकर हिचा मृत्यू टळावा, यासाठी मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तिचा मृत्यू टळणे, हेच तिची व्यष्टीसह समष्टी साधना किती चांगल्या तर्‍हेने चालू आहे, हे सिद्ध करते. यावरूनच ती संतपदाकडे लवकरच वाटचाल करील, याची निश्‍चिती झाली. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 
८. कृतज्ञताभावाने रडू येणे 
८ आ. गुरुमाऊलीला आनंद देण्यासाठी मी काहीच करू शकत नाही, 
या विचाराने रडू येत असतांना त्रास होत असल्याने रडू येत आहे, असे सहसाधिकेला वाटणे 
     रात्री माझ्या समवेत साखरेकाकू होत्या. त्यांना मी त्रास होत असल्याने रडत आहे, असे वाटायचे. त्या मला विचारायच्या, तुझे काही दुखत आहे का ? अंग चेपून देऊ का ? मी सांगायचे, काही दुखत नाही. कृपाळू गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला काहीच वेदना होत नाही. किती जपत आहेत बघा ना ! त्यांनाच किती वेदना होत असतील; पण ते कोणाला सांगणार ? या विचारानेच डोळे भरून येत आहेत. गुरुमाऊलीच्या चरणांवर हा जीव अर्पण करावा, असे मला वाटायचे; पण हा जीवही त्यांचाच ! काय करू त्या माऊलीला आनंद देण्यासाठी ? मी काहीच करू शकत नाही. तीच माझ्यासाठी अखंड करत आहे, या विचाराने मला झोप यायची नाही. रात्री डोळ्यांतून अश्रू येत असत. नंतर कधीतरी मला झोप लागायची. 
८ इ. काही साधना नसतांनाही कृपाळू गुरुमाऊलीने आपल्याला मृत्यूच्या दारातून सोडवले, तसेच या 
देहाच्या वेदना त्यांना किती सहन कराव्या लागल्या असतील ?, या विचारांनी डोळ्यांतून अश्रू येत असणे 
    तेव्हापासून रामनाथी आश्रमात येऊन त्यांचे दर्शन होईपर्यंत मला दृष्टीसमोर तेच दिसायचे. सर्व सार श्रीविष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी आहे. मला माझी काही साधना नसतांना, काही प्रयत्न नसतांनाही इतकी कृपाळू गुरुमाऊली मिळाली आहे. तिच्या कृपेमुळे मी यमाकडूनही परत आले. तिनेच सर्व कष्ट सहन केले. सर्वांना दीपालीचा देह दिसत होता; पण गुरुमाऊलीच सर्व त्रास सहन करत होती. गुरुमाऊली, मला या देहाला त्रास होतोय; म्हणून मला रडू यायचे नाही, तर या देहाच्या वेदना तुम्ही भगवंत असलात तरी मानवरूपात असल्याने तुम्हाला किती सहन कराव्या लागल्या असतील ?, या विचाराने रडू यायचे. 
९. पू. गाडगीळकाका आणि प.पू. पांडे महाराज उपाय करतांना सूक्ष्मातून दिसणे 
      सद्गुरु बिंदाताईंनी मला तुझ्यासाठी संत जप करत आहेत, असे सांगितले होते; पण मला कोणते संत जप करत आहेत, ते ठाऊक नव्हते. मला सूक्ष्मातून पू. गाडगीळकाका मुद्रा करून जप करतांना तर प.पू. पांडे महाराज अखंड मंत्र म्हणतांना दिसायचे. गुरुमाऊली, तुम्ही देवदेवता, महर्षि आणि संत यांचे अभेद्य कवच या जिवाभोवती निर्माण केले होते.
१०. प.पू. पांडे महाराजांनी केलेली कृपा 
१० अ. त्रास होत असल्याचे सांगितल्यावर प.पू. पांडे महाराज लगेच मंत्र 
म्हणत असणे आणि आता बरे वाटत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी आशीर्वाद देणे 
     ५.११.२०१६ या दिवशी मी प.पू. पांडे महाराजांना भ्रमणभाष करून मला बरे वाटत आहे, असे सांगितले. मी उद्या रामनाथीला जाणार, हे सांगितल्यावर त्यांना आनंद झाला. ते म्हणालेे, तुझ्यावर गुरूंची कृपा असल्याने तुला बरे वाटले. तुला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. माझी खरी दिवाळी आज आहे. तू मला हे सांगून आनंद दिलास. तुला मंगलमय आशीर्वाद ! प्रकृतीची काळजी घे. त्यांना त्रासाविषयी काहीही सांगितले की, ते लगेच मंत्र म्हणायचे.
१० आ. रात्री शरिराची हालचाल करू न शकणे आणि हा 
त्रास सांगितल्यावर प.पू. पांडे महाराजांनी उपाय सांगणे 
     कोल्हापूरला गेल्यावर रात्री विश्रांती घेऊन सकाळी रामनाथीला जायला निघायचे, या विचारानेच मला आनंद होत होता. तेव्हा प.पू .पांडे महाराजांनी भ्रमणभाष करून सांगितले, उद्या नको. १०.११.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात जायला निघा. त्या रात्री झोपल्यावर १ वाजता मला कुणीतरी बांधून ठेवले आहे, असे जाणवले. मला श्‍वास घेण्यास त्रास होत होता आणि शरिराची हालचाल करता येत नव्हती. मला गुदमरल्यासारखे होत होते. माझा जप चालू होता. नंतर मी डोळे उघडल्यावर मला सर्वत्र अंधार दिसत होता. नंतर १५ मिनिटांनी मी हालचाल करू शकले. हा त्रास प.पू. पांडे महाराजांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, स्वत:भोवती ७ वेळा तुळशीचे पान फिरवून खा. त्याप्रमाणे करून अपमृत्यू टळण्यासाठीचा मंत्र म्हटला. नंतर मला पूर्ववत बरे वाटू लागले.
१० इ. दुसर्‍या दिवशी धाप लागली असतांना प.पू. पांडे महाराजांना सांगितले नसूनही त्यांनी 
स्वतःहून भ्रमणभाष करून प्राणशक्ती वाढण्यासाठी मंत्र म्हणणे आणि त्यानंतर श्‍वास घेता येऊ लागणे 
     मला दुसर्‍या दिवशीही थकवा होता. त्यामुळे शरिराच्या हालचाली अल्प होत होत्या. मला श्‍वास घेण्यास त्रास होत होता. ध्यानमंदिरात बसले असतांना मला पुष्कळ धाप लागली. त्याच वेळी प.पू. पांडे महाराजांनी भ्रमणभाष करून सांगितले, प्राणशक्ती वाढण्यासाठी मंत्र म्हणतो. त्यांनी मंत्र म्हटल्यावर मला पुन्हा श्‍वास घेता येऊ लागला. मी त्यांना त्रास होत आहे, असे सांगितले नसतांनाही त्यांनी स्वतःहून भ्रमणभाष करून मंत्र म्हटला. तेव्हा संतांची सर्वज्ञता आणि प्रीती कशी असते, ते अनुभवायला मिळाले. गुरुमाऊली, मला त्यांच्या कृपेच्या छत्रछायेखाली अखंड ठेवत होती.
११. सद्गुरु स्वातीताईंनी आईप्रमाणे प्रेम देणे
अ. कोल्हापूर सेवाकेंद्रात सद्गुरु स्वातीताईंची भेट झाली. मध्येच थकवा आल्यावर सद्गुरु स्वातीताई मला पुष्कळ प्रेम द्यायच्या. त्या स्वतः मला प्रसाद भरवायच्या. मला कुशीत घेऊन आईच्या मायेने डोक्यावरून हात फिरवायच्या. त्यांच्या प्रेमानेच मन भरून यायचे. त्या सेवेत व्यस्त असूनही माझ्याकडे लक्ष द्यायच्या. 
आ. १०.११.२०१६ या दिवशी आम्ही सद्गुरु स्वातीताईंच्या गाडीतून रामनाथी आश्रमात जायला निघालो. तेव्हाही देवाने सद्गुरूंचा सहवास आणि त्यांच्या चैतन्याचा लाभ करून दिला. 
१२. रामनाथी आश्रमात येणे
१२ अ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले, सद्गुरु बिंदाताई, 
सद्गुरु गाडगीळकाकू आणि पू. गाडगीळकाका यांना भेटण्याची ओढ वाटणे 
     रामनाथी आश्रमात आल्यावर सर्व साधकांना पाहून मला आनंद झाला. साधिका माझ्याशी बोलू लागल्यावर श्रीविष्णूच्या चरणांतून निघालेल्या या प्रेमाच्या धाराच माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत, हे पाहूनच मन कृतज्ञतेने भरून येत होते. मी कधी एकदा प.पू. डॉक्टर, सद्गुरु बिंदाताई, सद्गुरु गाडगीळकाकू आणि पू. गाडगीळकाका यांना भेटते, असे वाटत होते. 
१२ आ. परम गुरुजी (परात्पर गुरु डॉक्टर आठवले) 
काय ते करू शकतात, असे महर्षींनी सांगणे 
     पू. गाडगीळकाका मला म्हणाले, तुम्ही आजारी असतांना महर्षींनी सांगितले होते, आम्ही काही करू शकत नाही. परम गुरुजीच काय ते करू शकतात. त्यामुळे मला जिवंत ठेवणार्‍या गुरुमाऊलीला मी कधी भेटेन, असे मला वाटत होते.
१२ इ. देवीसमान असणार्‍या सद्गुरु बिंदाताईर्ंशी भेट ! 
    सदगुरु बिंदाताईर्ंशी भेट झाली. मृत होत असलेल्या देहात चैतन्य निर्माण करणार्‍या त्या देवीचे दर्शन घेऊन मला आनंद होत होता. मला पाहून त्या म्हणाल्या, किती सुंदर दिसतेस ! प्रत्यक्षात शरीर पूर्ण काळे, वेदनांमुळे शक्तीहीन आणि त्वचा सुरकुतलेली झाली होती; पण आईला तिचे बाळ सुंदरच दिसते ! त्या म्हणाल्या, गुरुमाऊलींना भेटणार का ? तेव्हा मी हो म्हणाले.
१२ ई. प.पू. डॉक्टरांशी झालेली भेट
     १०.११.२०१६ या दिवशी मी श्रीविष्णूस्वरूप कृपाळू गुरुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्याशी माझा पुढीलप्रमाणे संवाद झाला.
१२ ई १. प.पू. डॉक्टरांनी माझे आयुष्य तुला द्यावे, असे वाटल्याचे सांगणे
प.पू. डॉक्टर : मला माझी एक चूक लक्षात आली.
(त्यांचे बोलणे ऐकून मला भीती वाटू लागली की, माझीच काहीतरी चूक झाली असणार; म्हणून ते असे म्हणत आहेत.)
प.पू. डॉक्टर : तुझी स्थिती गंभीर असल्याचे समजल्यावर मला वाटले, माझे आयुष्य तुला द्यावे; पण नंतर लक्षात आले, संतांच्या सांगण्याप्रमाणे आता माझे आयुष्य फारतर २ - ३ वर्षेच आहे. तेवढेच आयुष्य तुला देऊन काय उपयोग ? तुला अजून ५० - ६० वर्षे कार्य करायचे आहे. 
(मला काय बोलावे, तेच कळेना. मी त्यांच्याकडे पहातच बसले. त्यांनी ३ वेळा माझे आयुष्य तुला द्यावे, असे वाटल्याचे सांगितले.)
मी : तुमच्यामुळेच मी जिवंत आहे.
(गुरुमाऊलीने सांगितलेले ऐकून मला काय बोलावे, तेच कळेना. मला कृतज्ञता वाटत होती. देवा, या जिवाकडून तुला अपेक्षित अशी साधना होऊन तुझी अखंड कृपा अनुभवता येऊ दे. तुझ्या प्रत्येक रूपाप्रती कृतज्ञ रहाता येऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !)
१२ ई २. प.पू. डॉक्टरांनी देवाला तुझ्याकडून पुढे काही 
करवून घ्यायचे असल्यानेच जिवंत ठेवले आहे, असे सांगणे
प.पू. डॉक्टर : देवाने तुला जिवंत का ठेवले ? याचे कारण म्हणजे, देवाला तुझ्याकडून पुढे काही करवून घ्यायचे आहे ना ! संत आणि महर्षि किती करत होते ! यज्ञ केला. तू सगळ्यांना लळा लावलास; म्हणून त्यांनी केले. चमत्कारच आहे ना हा !
मी : तुमच्या कृपेमुळेच महर्षि, संत आणि साधक करत होते. परम गुरुजीच (प.पू. डॉक्टरच) वाचवू शकतात, असे महर्षि म्हणाल्याचे सद्गुरु गाडगीळकाकूंनी सांगितले, म्हणजे तुमच्यामुळेच मी जिवंत आहे. (तेव्हा मला फार कृतज्ञता वाटत होती. मीच नाही, तर सर्व साधक या घोर कलियुगात गुरुमाऊलीमुळेच सुरक्षित आहेत. त्यांच्या कृपेमुळेच श्‍वास घेत आहेत. साधकांचे सर्व त्रास ते आपल्यावर घेत आहेत.) मला अंधारच दिसायचा. माझा जीव बाहेर पडायचा; पण त्याला जाताच यायचे नाही. तो तिथेच थांबायचा. पांढरा प्रकाश त्याला तिथे थांबवून ठेवायचा.
१२ ई ३. प.पू. डॉक्टरांनी बाबा, भाऊ आणि साधक यांची प्रेमाने विचारपूस करणे 
प.पू. डॉक्टर : तेथील साधक कसे आहेत ? बाबा आणि भाऊ कसे आहेत ? त्यांना काय वाटले ?
मी : साधक बरे आहेत. बाबांना आणि भावाला काळजी वाटत नव्हती.
प.पू. डॉक्टर : तुझे वैद्यकीय अहवाल (रिपोर्ट) त्यांनी पाहिले नाहीत का ?
मी : पाहिले; पण तसे काही बोलले नाहीत.
प.पू. डॉक्टर : शिल्पाची (आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांची) भावजागृती कधीपासून होऊ लागली ? तिच्या तोंडवळ्यात पालट वाटतो ना !
मी : हो.
१२ ई ४. प.पू. डॉक्टरांनी थोडी ताकद आल्यावर प्रत्यक्ष प्रसारात जाऊन सेवा करायला 
सांगणे आणि तोपर्यंत रामनाथी आश्रमात राहूनच साधनेचा आढावा घ्यायला सांगणे
मी : सोलापूरला हिंदु धर्मजागृती सभा आहे.
प.पू. डॉक्टर : ३ आठवड्यांनी थोडी ताकद आल्यावर जा. तोपर्यंत इथून साधनेचे आढावे घे.
(तेव्हा मला फार कृतज्ञता वाटू लागली. त्यांना काही सांगितले नाही, तरी मनातले सर्व कळते. मला वाटत होते, आता रामनाथी आश्रमात विश्रांती आणि उपाय करायला सांगणार. सेवा बंदच ठेवणार. किती करतेस गं माउली !)
प.पू. डॉक्टर : कुणाचे आढावे घेतलेस ? मुलींपैकी कोणाशी बोललीस ?
मी : कुणाचेच घेतले नाहीत. माझ्या जवळ भ्रमणभाष नव्हता. प्रियांका स्वामीने भ्रमणभाष केला होता. 
प.पू. डॉक्टर : कशी आहे ती ? प्रयत्न चालू आहेत ना ? 
मी : तिच्याकडून प्रयत्न अल्प होत आहेत. प्रयत्न करते, असे तिने सांगितले.
प.पू. डॉक्टर : साधनेचे आढावे घेत रहा. 
१३. प.पू. डॉक्टरांनी केलेले कौतुक
१३ अ. भावसत्संगात थोडेसे बोलल्यावरही ३ वेळा खाऊ देऊन चैतन्य देणे 
     दोन दिवसांनी भावसत्संग होता. मी सद्गुरु बिंदाताई आणि भावसत्संग घेणार्‍या साधिका यांच्यासमवेत भावसत्संगात बसले. मी थोडेसेच बोलले. सद्गुरु ताई आणि साधिका यांनीच सत्संग घेतला. मी जे काही बोलले, तेही त्यांनीच बोलून घेतले; पण त्याचेही गुरुमाऊलीला कौतुक वाटत होते. त्याच दिवशी त्यांनी आधी सहसाधिकांकडून आणि नंतर अन्य साधिकेकडून खाऊ दिला. पुन्हा अन्य एका साधिकेकडून आणखी खाऊ दिला.
१३ आ. प्रत्यक्ष भेटीत दिलेला लाडू त्यांच्यासमोरच खाण्यास 
सांगणे आणि खाऊचे आणखी २ डबे देऊन भरभरून चैतन्य देणे 
     दुसर्‍या दिवशी सद्गुरु बिंदाताईंसमवेत प.पू. डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी हातात लाडू देऊन समोरच खा, असे सांगितले. मी म्हणाले, किती खाऊ देता ! तेव्हा त्यांनी दुसरा डबा दिला. मी पुन्हा म्हणाले, किती खाऊ देता ! त्यांनी आणखी एक डबा दिला. नंतर मी काही बोलले नाही. तेव्हा ते थांबले. तेव्हा असे वाटले, देवाला प्रत्येक साधकाला भरभरून द्यावेसे वाटते.
- कु. दीपाली मतकर (समाप्त)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn