Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुढील शंभर वर्षांत मुंबईचा ४० टक्के भाग पाण्याखाली येण्याची शक्यता !

  • शोधनिबंधाद्वारे शास्त्रज्ञांनी मुंबईकरांना करून दिली भविष्यातील संकटाची जाणीव !
  • संत आणि ऋषिमुनी यांनी जे सहस्रो वर्षांपूर्वी सांगितले आहे, ते शास्त्रज्ञ आता संशोधन करून सिद्ध करत आहेत. यावरून अध्यात्म हे विज्ञानापेक्षा कसे श्रेष्ठ आहे, हे लक्षात येते !
मुंबई, २३ डिसेंबर - वातावरणात सातत्याने होणार्‍या पालटामुळे जगभरातील समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. समुद्रपातळी वाढण्याचे प्रमाण याच गतीने चालू राहिल्यास पुढील १०० वर्षांत ४० टक्के मुंबई पाण्याखाली बुडण्याची शक्यता एका संशोधनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईवर येणारे हे संकट २६ जुलैच्या संकटापेक्षा कितीतरी पटींने मोठे असेल. ही माहिती इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीच्या वतीने भुवनेश्‍वरमध्ये झालेल्या ‘ट्रॉपमेट’ या राष्ट्रीय चर्चासत्रात एका शोधनिबंधावर झालेल्या चर्चेत देण्यात आली. ‘हवामानामधील पालटाचे मुंबईवर होणारे परिणाम’ या विषयावर हा शोधनिबंध होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे शास्त्रज्ञ आर्. मणी मुरली यांनी रियास एम्.जे., रेशमा के.एन्. आणि संतोष कुमार यांच्या साहाय्याने हा शोधनिबंध सिद्ध केला आहे.
१. प्रतिवर्षी समुद्र ३ किलोमीटर मुंबईच्या किनारपट्टीकडे सरकत आहे, असे निरीक्षण या शोधनिबंधामध्ये नोंदवले असून मुंबईच्या एकूण ४५८.५३ चौरस किलोमीटरपैकी १९० चौरस किलोमीटर क्षेत्र पुढील १०० वर्षांत पाण्याखाली येऊ शकते, असे भय या शोधनिबंधात वर्तवले आहे. 
२. समुद्राची खोली, पातळी, तापमान, क्षारता आणि घनता पालटल्यामुळे प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश नष्ट होण्याचा धोकाही वाढू शकतो. 
३. समुद्राच्या पातळीत होणार्‍या वाढीचे संकट लक्षात घेता विकासाची कामे आणि समुद्रालगतच्या वस्त्या यांचे पुनर्नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे या शोधनिबंधामध्ये म्हटले आहे. 
४. समुद्राच्या किनारी भागात चालवलेली ढवळाढवळ आणि हवेतील प्रदूषण न्यून करणे हासुद्धा या संकटाची तीव्रता अल्प करण्यासाठी उपाय म्हणून सांगण्यात आला आहे. 
५. या शोधनिबंधातील निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने वैज्ञानिक मंडळी यातील निष्कर्षांचा आढावा घेत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn