Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सोलापूरसह विविध ठिकाणी ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन !

सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांना निवेदन
देतांना माजी नगरसेवक श्री. बापू ढगे (डावीकडून चौथे) आणि समितीचे कार्यकर्ते
      सोलापूर, २२ डिसेंबर (वार्ता.) - ३१ डिसेंबरला नववर्षोत्सवाच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
सोलापूर
      येथील पोलीस आयुक्त श्री. रवींद्र सेनगावकर, एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे आणि जेलरोड पोलीस ठाणे या ठिकाणी संबंधितांना निवेदन देण्यात आले. तसेच उपजिल्हाधिकारी श्री. अजित रेळेकर यांनाही निवेदन दिले. या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, समितीचे विनोद रसाळ यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
पंढरपूर
     येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दबडे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गौरीशंकर शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे प्रवक्ते ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, भाजपचे श्री. बादलसिंह ठाकूर, पेशवा युवा मंचचे अध्यक्ष श्री. निखील देशपांडे, समितीचे शशीशेखर पाटील यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अकलूज
     येथे पोलीस निरीक्षक श्री. संजय सुर्वे यांना, तसेच तीन महाविद्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले आहे.
बार्शी
अपप्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाण्यांना नोटीस पाठवणार असल्याचे तहसीलदारांचे आश्‍वासन !
     येथे तहसीलदार श्री. राहुल शेळके आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र मनसावले यांना निवेदन देण्यात आले. येथील १५ महाविद्यालयांमध्येही याविषयीचे निवेदन देण्यात आले. या वेळी अपप्रकार न होण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना नोटीस पाठवतो, असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले.
बारामती
      येथे नायब तहसीलदार श्री. ठोंबरे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. गोरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच २ महाविद्यालयांमध्येही निवेदन देण्यात आले.
तुळजापूर
      येथे नायब तहसीलदार श्री. पी.एस्. राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. पोवार यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. कार्यकर्त्यांनी तुळजापूर भटकी शाळेतही निवेदन दिले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn