Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तरुण वयातच व्यायाम, प्राणायाम, स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण घ्या !

पू. भाऊ परब यांचा वाढदिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. त्यानिमित्ताने त्यांनी साधकांना 
केलेले मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली सुत्रे येथे पाहूया. 
पू. सदाशिव (भाऊ) परब
     ‘बर्‍याच जणांना उतार वयात विशिष्ट व्याधीने ग्रासलेले असते. मग आधुनिक वैद्यांकडून त्यांना औषधांच्या जोडीला विविध योगासने आणि नियमितपणे गतीने चालण्याचा समुपदेश दिला जातो. अशा प्रकारे केला जाणारा व्यायाम व्याधीत सुधार होण्यासाठी आणि व्याधी न बळावण्यासाठी केला जातो; मात्र हाच व्यायाम बालपणापासून किंवा तरुण वयापासून केल्यास व्याधी टळू शकतात किंवा पुढे जाऊन त्यांचे स्वरूप सौम्य होऊ शकते. 
१. सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांच्या जोडीला 
प्रतिदिन ३० मिनिटे सकाळी किंवा संध्याकाळी जलद चाला !
     सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांच्या जोडीला प्रतिदिन ३० मिनिटे सकाळी किंवा संध्याकाळी जलद चालण्याचा सराव केल्यास शरीर प्रकृती धडधाकट रहाते. मेंदू कार्यक्षम राहून निर्णयक्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते. दिवसभर शरिरात उत्साह आणि चेतना निर्माण होऊन सेवा किंवा कार्य परिपूर्ण होते. अशक्तपणा जाणवत नाही. काम अजून उत्साहाने करावेसे वाटते. अशा प्रकारे नियमित व्यायाम करत राहिल्याने व्यक्ती निरोगी राहून दीर्घायु होते. ‘देशाचा नागरीक सुदृढ, तर देश सुदृढ !’ हे सार्थ करण्यासाठी प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे.
२. येणार्‍या आपत्काळात आपण स्वत: सक्षम
राहून आपल्या देशबांधवांना साहाय्य करण्यासाठी पुढे व्हा !
     ‘पुढे घोर आपत्काळ आहे. त्यात तिसरे महायुद्ध होणार ! बॉम्बस्फोट होणार ! तसेच जोडीला पूर, धरणीकंप, वादळे, अपघात यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येतील’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. त्यामुळे येणार्‍या आपत्काळात आपण स्वत: सक्षम राहून आपल्या देशबांधवांना साहाय्य करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. त्यासाठी आताच आपल्याला व्यायाम करून स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण शिकून घेणे फार महत्त्वाचे आहे, तरच आपण इतरांना साहाय्य करू शकू. 
३. साधनेद्वारे घडलेली तरुण पिढी तेजोमय राष्ट्राचा आधारस्तंभ असून पुढील पिढीचा शारीरिक, 
मानसिक आणि आध्यात्मिक पाया भक्कम होण्याच्या दृष्टीनेही त्याची नितांत आवश्यकता असणे
     व्यायामाच्या जोडीला साधना करून आपले स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन करून शरणागत भावाने देवाचे सतत स्मरण, प्रार्थना, कृतज्ञता, भाववृद्धी केल्यास आनंदात वाढ होते. अशी व्यक्ती सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजात आदर्श होऊ शकते. अशा प्रकारे घडलेली तरुण पिढी तेजोमय राष्ट्राचा आधारस्तंभ ठरणार आहे. तसेच पुढील पिढींचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पाया भक्कम होण्याच्या दृष्टीनेही याची नितांत आवश्यकता आहे. 
४. हिंदु राष्ट्रासाठी सक्षम पोलादी पिढीची आवश्यकता !
     माझ्या हिंदुत्ववादी बांधवांनो आणि साधकांनो, आपला भविष्यकाळ अधिक तेजोमय होण्यासाठी लहानपणापासूनच नियमितपणे व्यायाम, प्राणायाम, स्वसंरक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण यांसाठी वेळ काढा आणि सशक्त अन् व्याधीमुक्त व्हा आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शन करून प्रोत्साहित करा ! हिंदु राष्ट्रासाठी सक्षम पोलादी पिढीची आवश्यकता आहे. 
५. चिकाटीने, उत्साहाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्याचे ध्येय समोर ठेवून प्रयत्न करा !
       हिंदु राष्ट्र संघर्षानेच निर्माण होणार आहे आणि जगतगुरु भगवान श्रीकृष्ण अन् गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादाने ते येणारच आहे; मात्र आपल्याला या संधीचा लाभ करून घ्यायचा आहे. यात सहभागी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम होऊन सज्ज रहायचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. चिकाटीने आणि उत्साहाने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्याचे ध्येय समोर ठेवून प्रयत्न करायचे आहेत. देव आपल्याला यश देणारच आहे. 
६. कृतज्ञता आणि प्रार्थना
     गुरुमाऊलीच्या कृपेने हे विचार आले. ते त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करून कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘सज्जन, हिंदु धर्माभिमानी आणि साधक यांना या दृष्टीने सज्ज बनण्याची सद्बुद्धी होवो’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी प्रार्थना करतो.’ 
- (पू.) श्री. सदाशिव (भाऊ) परब, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn