Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

कु. वैष्णवी वेसणेकर
अनेक जन्मांची ही पुण्याई, आज फळास आली ।
     मूळची कोल्हापूरची आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात रहाणारी बालसाधिका कु. वैष्णवी वेसणेकर (वय १६ वर्षेे) हिच्याविषयी मे २०१४ मध्ये दैनिक सनातन प्रभातमध्ये लिखाण वाचल्यावर श्रीकृष्णाने एका साधिकेला पुढील कविता सुचवली.
चिमुकल्या या जिवावर आज गुरुकृपा झाली ॥
अनेक जन्मांची ही पुण्याई आज फळास आली ॥ धृ. ॥
गुुरुसेवेचा ध्यास लागला । मायेचा पिंजरा तोडला ॥
गुरुसावली मिळाली तिला । गुरुसेवेत जीव हा गुंतला ॥ १ ॥धन्य धन्य ते मातापिता । कोवळ्या जिवास अर्पिती गुरुचरणा ॥
कुलस्वामिनीची कृपादृष्टी होता । गुरुसेवेत जीव हा रमला ॥ २ ॥
नावात दुर्गेचे तत्त्व । त्यात मिळाले गुरूंचे सत्त्व ॥
चिमुकला जीव वागतो नम्रतेत । जिंकले गुरूंचे ममत्व ॥ ३ ॥
गुरुकृपेने उचलले शिवधनुष्य । नामस्मरणाचा बाण सोडून ॥
अवचित नेम धरून । जन्म-मृत्यूचे चक्र भेदून ॥ ४ ॥
चिमुकल्या जिवाच्या पंखात । गुरूंच्या कृपेचे बळ हे मिळता ॥
गगनी उंच भरारी घेता । आनंदास पारावर नव्हता ॥ ५ ॥
जन्म सार्थकी लागता । गुरुचरणी चित्त स्थिरावले आता ॥
रणरागिणी बन तू आता । हाती धर्मध्वज शोभेल तुझ्या ॥ ६ ॥
हे श्रीकृष्णा, शरणागतीची हीच प्रार्थना ।
आता सर्व जिवांवरी कृपादृष्टी करावी ॥
आम्ही झालो तुझे भाट । आम्हा मार्गी ने बा नीट ।
हीच वाट पहातो रे साधक ॥ ७ ॥
॥ श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ शुभं भवतु ॥
- श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी (११.५.२०१४)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn