Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे आणि लातूर येथील नगरपालिकांमधील निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

     मुंबई, १५ डिसेंबर - पुणे आणि लातूर या जिल्ह्यांत झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने सरशी केली आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील १४ नगरपालिकांपैकी ५ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. उर्वरित ठिकाणी काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, तर एका ठिकाणी शिवसेनेचा आणि अन्य ३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या सर्व नगरपालिकांमध्ये असलेल्या ३२४ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे १०७, भाजपचे ८१, काँग्रेसचे ३१, शिवसेनेचे २३ असे नगरसेवक निवडून आले. येथे ३९ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक निवडून आले. 

पुणे 
     येथील आळंदी, लोणावळा, तळेगाव दाभाडे या ३ ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून जेजुरी, इंदापूर आणि सासवड या ३ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. बारामती आणि दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपद जिंकले आहे. जुन्नर येथे शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळवले आहे. 
 लातूर 
     जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा आणि अहमदपूर येथील नगरपालिकांवर गेली अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. त्याला भाजप आणि अन्य पक्षांनी शह दिला आहे. उदगीर आणि निलंगा येथे भाजपने सर्वाधिक जागा जिंकून नगराध्यक्षपद मिळवले आहे. अहमदपूर येथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. औसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून नगराध्यक्ष पदाचीही जागा जिंकली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn