Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘वरदा’ चक्रीवादळात १० जण ठार !

        चेन्नई - १२ डिसेंबरला ताशी १२० कि.मी. वार्‍याच्या वेगाने ‘वरदा’ चक्रीवादळ चेन्नई आणि उत्तर तमिळनाडू किनारपट्टीवरील जिल्ह्यांत धडकले. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण घायाळ झाले. गेल्या ५० वर्षांत चेन्नई शहरात आलेले हे सर्वांत वेगवान चक्रीवादळ आहे. तिरुवल्लूवर आणि कांचीपुरम् या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. किनारपट्टीवरील लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले. तरीदेखील या चक्रीवादळामुळे लक्षावधी लोकांना फटका बसला आहे. ‘१३ डिसेंबरला ते कर्नाटकात पोचेल आणि गोव्यात संपुष्टात येईल’, अशी चेतावणी हवामान विभागाने दिली होती.
कार्तिक दीपम्’ मुळे तमिळनाडूतील 
चक्रीवादळापासून साधकांचे रक्षण होईल ! 
साधकांना आश्‍वस्त 
करणारे महर्षींचे आशीर्वचन !
       ‘१२.१२.२०१६ या दिवशी तमिळनाडूत विनाशकारी चक्रीवादळ आले आहे, त्याच वेळी तमिळनाडूत प्रतिवर्षाप्रमाणे ‘कार्तिक दीपम्’ हा धार्मिक विधीही होत आहे. ‘चक्रीवादळामुळे मानवी हानी होणार असली, तरी ‘कार्तिक दीपम्’मुळे साधकांचे रक्षण होणार आहे’, असे आशीर्वचन देऊन महर्षींनी साधकांना आश्‍वस्त केले आहे. पुढील आपत्काळातही साधकांचे रक्षण होणार असल्याचे महर्षींनी यापूर्वीच सांगितले आहे. साधकांचे सदैव रक्षण करणार्‍या महर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
       १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (‘वरदा’ चक्रीवादळ चेन्नईच्या किनार्‍यावर धडकले आहे. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn