Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

भारताच्या मुक्त ज्ञान समाज निर्मितीसाठी भारतवाणी योजना !

मानव संसाधन विकास मंत्रालयाचा उपक्रम 
विविध भारतीय भाषा आणि क्षेत्रे यांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळणार !
      देहली - भारताच्या मुक्त ज्ञान समाज निर्मितीसाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या भारतीय भाषा संस्थेकडून भारतवाणी योजना आखण्यात आली आहे. या योजनेनुसार समस्त भारतीय भाषांमधील ज्ञान एका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये १२१ भाषांना समाविष्ट करण्यात आले आहे. या माध्यमातून देशातील जवळपास सर्व भाषा आणि समुदाय यांच्याशी संपर्क साधण्याची सरकारची योजना आहे. या संकेतस्थळासाठी खाजगी संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे. 
१. भारतवाणी संकेतस्थळाचा लाभ विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पार्श्‍वभूमी असलेल्या आणि सर्व वयोगटातील लोकांना घेता येणार आहे. 
२. प्रारंभी विषय तज्ञांकडून रचलेले आणि प्रतिष्ठित संस्था यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेले साहित्य या संकेतस्थळावर ठेवण्यात आहे.
३. प्रत्येक भाषेसाठी संपादकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नवनिर्मित साहित्याच्या प्रकाशनाविषयी निर्णय घेईल. 
४. भारतवाणीद्वारे भारतीय भाषा किंवा मातृभाषा यांचे साहित्य विस्तृतपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
५. लुप्त झालेल्या भाषा, अल्पसंख्यांक भाषा आणि आदिवासी भाषा यांना या संकेतस्थळावर विशेष स्थान देण्यात येणार आहे. 
६. या योजनेमुळे कृषी, व्यापार, शिक्षण, सामाजिक क्षेत्र, विविध सेवा देणारे संकेतस्थळे आदी संदर्भात एकाच संकेतस्थळावर ज्ञान उपलब्ध होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn