Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दैनिक सनातन प्रभातमधील सूचनेप्रमाणे पितृपक्षात ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या
(डॉ.) सौ. नंदिनी सामंत
१. ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप एका लयीत होणे आणि पुष्कळ आनंद जाणवणे : ‘२७.९.२०१६ या दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत मी उपायांना बसल्यावर ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप म्हणण्यास प्रारंभ केला. जप चालू करताच तो एका लयीत होऊ लागला. काहीच क्षणांत मला जपातून पुष्कळ आनंद जाणवू लागला. 
२. पितरांप्रती धर्मकर्तव्य बजावत असल्यामुळे जपातून आनंद जाणवत असल्याचे देवाने सूक्ष्मातून सांगणे, अवतीभोवती पूर्वजांचे अस्तित्व जाणवू लागणे आणि जप त्यांच्या दिशेने जात असल्याचे जाणवणे : ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या जपातून आनंद का जाणवतो ?’, असे देवाला विचारल्यावर देव सूक्ष्मातून म्हणाला, ‘पितरांप्रती धर्मकर्तव्य बजावत असल्यामुळे तुला आनंद जाणवत आहे.’ या आनंदाचे आलंबन केल्यावर जपातील एकाग्रता आणखी वाढली. जप जसा होत गेला, तसे मला माझ्या अवतीभोवती माझ्या अनेक जन्मांतील पूर्वजांचे अस्तित्व जाणवू लागले. त्या वेळी मला भीती न वाटता आणि जपातील एकाग्रता भंग न पावता उलट त्यांच्याविषयी कृतज्ञता अन् कणव जाणवत होती. जप त्यांच्या दिशेने जात असल्याचे मला जाणवले.
३. पितरांप्रतीचा वात्सल्यभाव आणि कृतज्ञताभाव यांमुळे आत्मीयतेने जप होणे आणि पितरांना होत असलेला लाभ प.पू. डॉक्टरांकडून येणार्‍या कृपारूपी चैतन्याच्या झोतामुळे असल्याचे लक्षात येणे : त्यानंतर कधी वात्सल्यभावाने ‘जणू ते सर्व पितर माझ्या पोटची मुले आहेत’, या आत्मीयतेने जप होत होता, तर कधी ‘पितरांमुळे आज माझे अस्तित्व आहे’, या कृतज्ञताभावाने जप होत होता. मी करत असलेला जप त्यांच्यापर्यंत पोेचत असल्याचे आणि त्यांना त्याचा लाभ होत असल्याचे मला जाणवत होते. त्यानंतर लक्षात आले, ‘माझ्या पितरांना होत असलेला लाभ प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून येणार्‍या कृपारूपी चैतन्याच्या झोतामुळे आहे. मी करत असलेला जप केवळ माध्यममात्र आहे.’ त्यानंतर अन्य साधकांच्या पितरांचे अस्तित्व जाणवू लागले आणि त्यांनाही असाच लाभ होत असल्याचे मला जाणवले.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘गुरु साधकांसमवेतच त्यांच्या कुटुंबियांचेही दायित्व कसे घेतात ?’, याची अनुभूती दिली, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे, तसेच ‘आम्हा सर्व साधकांच्या पितरांना गती मिळून ते अपेक्षित गंतव्याच्या दिशेने पांथस्थ व्हावेत, यासाठी आम्हा साधकांकडून निमित्तमात्र जे सर्व प्रयत्न अपेक्षित आहेत, ते तुम्हीच आमच्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ 
- आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत, रामनाथी, गोवा. (२७.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn