Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मुंबई येथील ‘प्राचीन भारतीय ज्ञान पद्धत’ परिसंवादात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा सहभाग !

आध्यात्मिक संशोधनाचा
शोधनिबंध सादर करतांना श्री. रमेश शिंदे
      मुंबई - ‘भारतीय प्रोद्योगिकी संस्थाना’च्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांनी भांडूप येथे आयोेेजित केलेल्या ७ दिवसांच्या ‘प्राचीन भारतीय ज्ञान पद्धत’ (Ancient Indian Knowledge Systems) परिसंवादात वेद, वेदांगे, दर्शन, उपवेद आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले, तसेच हिंदु संस्कृतीविषयीचे शोधार्थींचे वैेज्ञानिक संशोधन प्रस्तूत करण्यात आले. या परिसंवादात विविध उच्चशिक्षण देणार्‍या विश्‍वविद्यालयांचे विद्यार्थी, शोधार्थी, प्राध्यापक, तसेच हिंदु विद्या क्षेत्रात कार्यरत गुरुकुलांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     या परिसंवादात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पीप’ तंत्रज्ञानाद्वारे संस्कृत आणि इंग्रजी मुळाक्षरांसंबंधी केलेल्या आध्यात्मिक संशोधनाचा शोधनिंबध सादर केला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी हा शोधनिबंध सादर केल्यानंतर अनेक शोधार्थी आणि विद्यार्थी यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे संशोधनकार्य अन् ग्रंथ आदींविषयी जाणून घेतले. 
     परिसंवादाच्या शेवटच्या दिवशी ‘पुढील कृतीची दिशा’ या विषयावर ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे श्री. चेतन राजहंस यांनी पुढील सूत्रे मांडली.
१. हिंदु विद्या अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेली गुरुकुले, तसेच या क्षेत्रासाठी समर्पित प्राध्यापक, संशोधक आदी समविचारींचे संघटन होण्यासाठी समान व्यासपीठ निर्माण करणे आवश्यक आहे. या व्यासपिठामुळे हिंदु आचार, संस्कृती, परंपरा, विद्या आदी क्षेत्रांतील संशोधनाचे आदान-प्रदान होईल, तसेच हिंदु विद्येचा प्रचार करणार्‍या गुरुकुलांचेही संघटन होईल. 
२. ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’कडून आजपर्यंत हिंदु आचार, आहार, वेशभूषा, केशभूषा, संस्कृती, मंदिरे आदींची सात्त्विकता सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांद्वारे सतत संशोधन चालू आहे. या शोधकार्यात शोधार्थी, प्राध्यापक, गुरुकुले आणि विश्‍वविद्यालये त्यांच्याकडील शोधसाधनांद्वारे सहभागी होऊ शकतात. यामुळे कलियुगात हिंदु संस्कृतीचे महत्त्व वैज्ञानिक भाषेत पोचवणे सुलभ होणार आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn