Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

डावीकडून सौ. अलका व्हनमारे, श्री. सुनील घनवट, सूत्रसंचालक
श्री. नारायण येरवा, नगरसेवक बापू ढगे आणि श्री. विनोद रसाळ
आज सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
  • स्वरांजली केबलवाहिनीकडून धर्मसभेनिमित्त समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत टॉक शो !
  • ४ लक्ष नागरिकांपर्यंत पोचणार धर्मसभेचा विषय
     सोलापूर - येथील स्वरांजली केबल वाहिनीने सभेनिमित्त समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत टॉक शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात हिंदु राष्ट्राची आवश्यकता, हिंदु धर्मजागृती सभेची आवश्यकता, राष्ट्र आणि धर्म या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. विनोद रसाळ, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हासंघटक सौ. अलका व्हनमारे यांसह माजी नगरसेवक श्री. बापू ढगे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम १ घंट्याचा होता. त्याचे ३ वेळा प्रक्षेपण होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या टॉक शोमुळे धर्मजागृती सभेचा विषय ४ लक्ष नागरिकांपर्यंत पोचण्यास साहाय्य होणार आहे.
सभेच्या बैठकांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
१. कासेगाव येथे लोकमंगल बँकेच्या कार्यक्रमात समितीचे श्री. अमित कदम यांनी विषय मांडला. ५०० नागरिक उपस्थित होते. समाधाननगर येथील बैठकीचे आयोजन श्री. सोमेश मायनवार यांनी केले. तेथून धर्मशिक्षणवर्गाची मागणी करण्यात आली.
२. मंद्रुप येथे प्रत्येक रविवारी धर्मशिक्षणवर्ग चालू झाला.
३. ग्रामदैवत सिद्धेश्‍वर आणि श्री रूपाभवानी यांचे आशीर्वाद घेऊन सभेच्या प्रसाराला प्रारंभ करण्यात आला.
४. स्वाध्याय परिवाराच्या येथे झालेल्या बैठकीचे आयोजन श्री. विठ्ठल डोगे यांनी केले होते.
५. वांगी येथे मार्गदर्शन केल्यावर १५ दिवसांतून धर्माशिक्षणवर्ग घेण्याची मागणी करण्यात आली.
६. भुलभाई चौकात शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक झाली. या वेळी ६० जण उपस्थित होते. रमेश पांढरे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
७. निलमनगर येथे सिद्राम चरकूपल्ली यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
८. माधवनगर येथील योगाचार्य श्री. दत्तात्रय कोंडा यांच्या योगवर्गात मार्गदर्शन केले.
खानापूर येथील मारुति मंदिरात झालेल्या बैठकीला १२० नागरिकांची उपस्थिती होती. येथील नागरिक सभेसाठी फुले अर्पण देणार आहेत. 
९. दहिटने येथील तरुणांनी समितीला उपस्थित रहाण्याचा निर्धार केला. विडी घरकुल एच ग्रुप येथे झालेल्या नियोजनाच्या बैठकीत तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
१०. हिंदु-रक्षक युवा प्रतिष्ठान, अक्कलकोट रस्ता येथे बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
११. वृत्तवेध वाहिनीचे चालक श्री. पांडुरंग सुरवसे यांनी सभेनिमित्त हिंदु धर्माची दशा आणि दिशा हे चर्चासत्र घेऊन समितीच्या पदाधिकार्‍यांना सहभागी केले.
शिवसेनेच्या युवासेना जिल्हाध्यक्षांचा सभेला पाठिंबा !
डावीकडून श्री. विनोद रसाळ, मध्यभागी
श्री. गणेश वानकर आणि श्री. सुनील घनवट
    सोलापूर, ३ डिसेंबर (वार्ता.) - आमचा हिंदु धर्मजागृती सभेस पाठिंबा असून सभेला पुष्कळ संख्येने उपस्थित राहू, असे आश्‍वासन शिवसेनेचे युवासेना जिल्हाध्यक्ष श्री. गणेश वानकर यांनी दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. विनोद रसाळ उपस्थित होते.
मान्यवरांना निमंत्रणे
     बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, शहर संयोजक दीपक पवार; विडी कामगार सेनेच्या अध्यक्षा सौ. पद्मताई म्हंता आणि महाराष्ट्र कामगार सेनेचे सरचिटणीस विष्णू कारमपुरी; हत्तूर येथील ग्रामदेवतेच्या मंदिरातील स्वामीजी; श्रीराम सेनेचे शहराध्यक्ष श्री. परमेश्‍वर माळगे; नगरसेविका सौ. राजश्री बिराजदार; शेळगी येथील भाजप नगरसेवक अविनाश पाटील, शिवराज नागणसुरे, केदार बाळशेट्टी; शहीद अशोक कामटे विचार मंचचे श्री. योगेश कुंदुर, शिवराज धप्पाधुळे, शिवसृष्टी प्रतिष्ठानचे अमोल केकडे, ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर यात्रेचे मानकरी श्री. राजशेखर हिरेहब्बू, आदींना सभेचे निमंत्रण देण्यात आले.
सभेचा तपशील
स्थळ : हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर.         
वेळ : सायंकाळी ५.३० 
संपर्क : ८३०८६५२३६३
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn