Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

काळगती ओळखून त्याप्रमाणे कार्य करणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. जगात ‘इंटरनेट’ही संकल्पना प्राथमिक 
टप्प्यात असतांना प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्था 
आणि हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे सिद्ध 
करण्यास (बनवण्यास) सांगणे अन् काही वर्षांनी इंटरनेटचा वापर 
वाढू लागल्यावर त्या संकेतस्थळांच्या माध्यमातून व्यापक प्रसार होणे
    ‘वर्ष २००४-०५ या कालावधीत जगात ‘इंटरनेट’ ही संकल्पना प्राथमिक टप्प्यात होती. त्या वेळी अनेकांकडे ‘इंटरनेट’ची सुविधा उपलब्ध नव्हती आणि ज्यांच्याकडे होती ती ‘६४ केबीपीएस्’ (किलो बाइट्स पर सेकंद) अर्थात् ‘डायलअप’ इतक्या अल्प गतीची होती. त्या वेळी ‘प्रसारासाठी एखादे संकेतस्थळ बनवावे’, ही कल्पना विशेष कोणाला सुचणारी नव्हती.
श्री. अनित पिंपळे
     त्याच काळात प.पू. डॉक्टरांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळे निर्माण करण्यास सांगितली. त्याप्रमाणे संकेतस्थळांची निर्मिती झाली. पुढे ‘इंटरनेट’चा वापर वाढू लागल्यावर संकेतस्थळांच्या माध्यमातून आपल्याला लाखो लोकांपर्यंत पोेचण्याची संधी उपलब्ध झाली. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने आणि संकल्पाने आपली संकेतस्थळे यथायोग्य वेळेत सिद्ध झाली, तसेच अधिक प्रमाणात सुप्रसिद्ध झाली. 
    प्रसिद्धीमाध्यमे हिंदूंची विशेष नोंद घेत नसतांना संकेतस्थळांद्वारे गेली अनेक वर्षे कोट्यवधी हिंदूंचे विविध विषयांवर प्रबोधन करणे शक्य झाले. लाखो हिंदूंना धर्मजागृती कार्यात सहभागी होता आले. प.पू. डॉक्टरांनी लावलेल्या त्या इवल्याशा रोपट्याचे आता मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या अग्रक्रमी असलेल्या संकेतस्थळांमधे हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळही आहे.
    (‘केवळ भारतातच नव्हे, तर विश्‍वभरातच ही संकेतस्थळे अध्यात्मप्रसाराचे प्रभावी माध्यम होऊन द्रष्ट्या गुरुदेवांच्या कृपेने जगभराच्या साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची संधी उपलब्ध झाली.’ - संकलक) 
२. एका दशकापूर्वी वेदपाठशाळा चालू होऊन वेदपाठशाळेच्या 
माध्यमातून सध्याच्या समष्टी साधनामार्गाच्या कृतीची सिद्धता करणे
    १०.१०.२०१६ या दिवशी आश्रमात होत असलेला ‘बगलामुखी याग’ पहाण्याची संधी मिळाली. वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली या यागाचे पौरोहित्य सनातनच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थी करत होते.
    हे दृश्य पाहून मला प.पू. डॉक्टरांचे स्मरण झाले. वर्ष २००८ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे सनातन साधक पुरोहित पाठशाळा चालू केली. त्यामागे ‘सात्त्विक पुरोहित घडवणे, पौरोहित्याद्वारे साधना करून त्यांना संत घडवणे’, असा उद्देश होता. या ८ वर्षांत या वेदपाठशाळेतून काही विद्यार्थी सिद्ध झाले आहेत. हे विद्यार्थी साधकांचे विवाह, मुंज, शांती आदी विधी शास्त्रोक्त पद्धतीने आणि भावपूर्णरित्या करतात. याव्यतिरिक्त हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि समष्टीच्या कल्याणासाठी विविध यज्ञयाग, अनुष्ठाने, पारायणे, कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना अशा विविध विधींच्या स्वरूपात महान परमपवित्र कृतीही समर्थपणे करत आहेत. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे त्यांच्या हातून धार्मिक स्तरावर व्यापक समष्टी साधना होत आहे. सध्याच्या हिंदु राष्ट्रासाठी काळानुसार यज्ञयाग करणे आवश्यक आहे. त्यासाठी महर्षि आणि अनेक संत यांच्या आज्ञेने आश्रमात सतत विविध धार्मिक विधी केले जातात. अनेक विधींना एकापेक्षा अधिक पुरोहित असणे आवश्यक असते. समाजाची स्थिती पहाता सात्त्विक पुरोहित मिळणे अतिशय कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत यथायोग्य वेळी पाठशाळेतून साधक पुरोहित सिद्ध झालेले असणे, ही प.पू. डॉक्टरांची कृपा आहे, यात तीळमात्र शंका नाही. अशा महान श्रीगुरूंच्या श्रीचरणी कोटी कोटी कृतज्ञता ! आपण आम्हाला जवळ केलेत, आपले कृपाछत्र दिलेत, त्यासाठी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
३. उच्छिष्ट गणपतियागासाठी वापरलेले यज्ञकुंड यज्ञ 
झाल्यानंतरही ठेवणे आणि त्याचा उपयोग पुढील यज्ञांच्या वेळी होणे
     अग्नियोगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या शुभहस्ते सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘उच्छिष्ट गणपतियज्ञ’ झाला. या कार्यासाठी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील अंगणात दोन मोठी यज्ञकुंडे सिद्ध करण्यात आली होती. यज्ञ संपन्न होऊन काही मास झाल्यावरही दोन्ही यज्ञकुंडे प.पू. डॉक्टरांनी तशीच ठेवण्यास सांगितले होते. या यज्ञकुंडांमुळे आश्रमातील अंगणात वाहने लावण्यासाठी थोडा अडसर होत होता. त्या वेळी मनात विचार येत असे, ‘साधकांना यज्ञाचे चैतन्य मिळावे, यासाठी यज्ञकुंड काढलेले नाही; पण यामागे आणखी काहीतरी ईश्‍वरी नियोजन असेल.’ 
     सध्या महर्षींच्या आज्ञेने सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक मोठे यज्ञयाग होत आहेत. या विधींसाठी यातील एका यज्ञकुंडाचा वापर केला जात आहे. अन्य एक यज्ञकुंड काढण्यात आले आहे. यज्ञकुंड मोठे असल्याने आणि तेथे विधीकर्त्याला बसण्याची चांगली सोय असल्याने या विधींसाठी ते अगदी सोयीचे ठरत आहे. काळानुसार यज्ञकुंडाची आवश्यकता पुढे भासणार आहे, हे प.पू. डॉक्टरांना ठाऊक होते. माझ्या अज्ञानी बालबुद्धीला ते कसे कळणार ? काळाच्या पडद्याआड दडलेले हे श्रीगुरूंचे सुंदर नियोजन पाहून मन श्रीचरणी नतमस्तक झाले. 
     (आता नवीन ठिकाणी यज्ञकुंड सिद्ध करण्यात आले आहे. - संकलक)
४. योग्य वेळी दैवी बालके जन्माला येेऊन वर्तमानात तसेच 
भविष्यात प्रसारकार्य सांभाळण्यासाठी साधक सिद्ध होणे
      केवळ स्थुलातीलच नाही, तर सूक्ष्मातीलही अनेक गोष्टी प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच घडत असतात, उदा. काही वर्षांपूर्वी उच्च लोकांतून जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे आजची युवापिढी आहे. या युवापिढीच्या माध्यमांतून आता संस्थेचे प्रसारकार्य घडत आहे. योग्य वेळी त्यांचे दैवीपण उघड होणे, त्यांनी मायेतून मुक्त होऊन कार्यासाठी स्वतःला झोकून देणे आणि त्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक स्तरावर साधक घडवण्याची प्रक्रिया होणे, हे सर्वकाही केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच झाले आहे. आता जन्माला येणारी दैवी बालके ही हिंदु राष्ट्राची भावी पिढी असेल. सर्वकाही ईश्‍वर नियोजित आणि व्यवस्थितपणे होत आहे. 
५. भावी काळात पूर्ण वेळ साधना करणार्‍या साधकांची संख्या 
वाढणार असल्याचे जाणून काही वर्षांपूर्वीच मोठ्या आश्रमांचे बांधकाम करणे
      पूर्वी पूर्ण वेळ साधकांची संख्या अल्प होती. लहानशा सेवाकेंद्रांतून सनातनचे मोठे आश्रम निर्माण झाले. आश्रमांची व्यवस्था करतांनाही भावी काळाचाच विचार केला गेला. पुढे सहस्रोे साधक राहू शकतील, या दृष्टीने आश्रमांची बांधणी केली गेली आहे. आता पूर्ण वेळ साधना करणार्‍यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे, तसेच आपत्काळ येईल तशी त्यात पुष्कळ वाढ होईल. प.पू. डॉक्टरांची दूरदृष्टी आणि त्यांची प्रीती यांना कोटी कोटी प्रणाम !’ 
- श्री. अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn