Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांनी दिलेले अमूल्य दृष्टीकोन !

सौ. अश्‍विनी पवार
     गुरुदेवांच्या कृपेमुळे देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधकांना कधी सत्संगाच्या, तर कधी सेवेच्या माध्यमातून वा प्रत्यक्ष सहवासातून सौ. अश्‍विनीताईचा (सौ. अश्‍विनी पवार यांचा) सत्संग मिळतो. देवाने या सत्संगात ताईच्या माध्यमातून दिलेले साधनेचे दृष्टीकोन सर्वांसाठीच आदर्श आहेत.
२. सेवेच्या संदर्भात
अ. एखादी सेवा मिळणे, ही आपल्यावर झालेली गुरूंची कृपा असते. बाहेर सेवा मिळण्यासाठी धडपडावे लागते.
आ. देव सेवा देतो आणि ती करण्यासाठी क्षमताही देतो. देव आपली श्रद्धा किती आहे, ते बघतो. माघार न घेता सतत शिकत रहायला हवे.
इ. पाट्याटाकूपणा असेल, तर सेवा पुष्कळ मोठी वाटते.
ई. सेवा करतांना अयोग्य विचार केल्यास सेवेत चूक होते.
उ. माझ्याकडे सेवा आल्यावर ती परिपूर्णच केली पाहिजे, असे वाटले पाहिजे.
ऊ. वेळ व्यर्थ न घालवता गुरुसेवा केली, तर स्वतःवर काळ्या शक्तीचे आवरण येणार नाही.
ए. संतांनी सांगितलेली कुठलीही सेवा करणे महत्त्वाचे असते.
ऐ. एखादे संत वयस्कर आहेत; म्हणून त्यांना साहाय्य करायचे, असे नाही, तर आपल्या उद्धारासाठी संतसेवा आहे.
३. आपल्याकडून झालेल्या चुकांसंदर्भात
अ. आरशासमोर आपण आपले रूप पहात असतांना त्यातील त्रुटी आपण सहजतेने दूर करतो, त्याचप्रमाणे आपण चुका सहजतेने स्वीकारून त्या सुधाराव्यात.
आ. चुका सहजतेने स्वीकारणे, हे अहं अल्प असल्याचे लक्षण आहे.
इ. कुणीही, कधीही आणि कोणत्याही वेळी आपली चूक अथवा सूत्र आपल्याला सांगू शकेल, अशी आपली स्थिती निर्माण करायला हवी.
ई. चूक झाल्यावर चिंतनाची प्रक्रिया आपोआप होणे, हा संस्कार आपण आपल्या मनावर करून घ्यायला हवा; कारण चिंतनातून मिळणारा उपायच पुढे चूक होऊ देत नाही.
उ. चुकांविषयी खंत वाटल्यावरच चुकीविषयीचे गांभीर्य लक्षात येते.
ऊ. खंत आध्यात्मिक स्तरावर असेल, तर आनंद मिळतो.
ए. ज्याला आपले काय चुकले, ते खरेच समजून घ्यायचे असते, तो सांगितलेल्या सर्व सूत्रांचा विचार करतो.
- श्री. संदेश नाणोसकर (वय १९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.८.२०१६)  (क्रमश: उद्याच्या अंकात)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn