Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सौ. शोभा कौलकर यांच्या वाढदिवसानिमित्त कु. दीपाली पवार यांनी दिलेल्या शुभेच्छापत्रातील लिखाण !

सौ. शोभा कौलकर यांचा वाढदिवस काल झाला. त्यानिमित्ताने
कु. दीपाली पवार यांनी त्यांना शुभेच्छापत्र दिले. त्यांतील लिखाण येथे देत आहोत.
सौ. शोभा कौलकर
     ‘सौ. शोभाकाकू शरणागत भावाने करत असलेली प्रार्थना ऐकून कृष्ण त्यांच्यासमोर प्रगट होतो. त्या वेळी त्यांच्यात झालेले संभाषण पुढे देत आहे. 
१. श्रीकृष्णाला मार्गदर्शन आणि साहाय्य
करण्यासाठी प्रार्थना करणार्‍या सौ. शोभाकाकू ! 
     सौ. शोभा : हे श्रीकृष्णा, मला तुला अपेक्षित अशी साधना आणि प्रगती करायची आहे; पण माझ्याकडून तुला अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत. ‘मी स्वतःला पालटण्यासाठी नेमके काय प्रयत्न करायचे ?’, तेच कळत नाही. त्यामुळे मला ताण आणि दडपण येते. कृष्णा, सांग ना मी काय करू ते ? कशी पालटू मी स्वतःला, सांग ना ! कृष्णा, मला तुझे मार्गदर्शन आणि साहाय्य हवे आहे. तुझे साहाय्य आणि मार्गदर्शन यांविना मी पालटू शकेन, असे मला वाटत नाही; म्हणून कृष्णा, माझ्यावर कृपा कर. मला साहाय्य कर. मी तुझ्या चरणी संपूर्णपणे शरण आले आहे.
२. श्रीकृष्णाने सौ. शोभाकाकूंना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन ! 
श्रीकृष्ण : अगं शोभाकाकू, तुझी शरणागती मला आवडली. तू शरणागत भावाने केलेल्या प्रार्थनेमुळेे तुला मार्गदर्शन आणि साहाय्य करण्यासाठी मी तुझ्यासमोर आज प्रकट झालो आहे. मी आता जे काही मार्गदर्शन करीन, ते तू अंतर्मनापासून ऐक. तू ‘अंतर्मनापर्यंत सूत्रे जावीत’, अशी प्रार्थना कर आणि मन लावून ऐक.
श्रीकृष्ण : हे बघ शोभाकाकू, ‘ज्यांना आध्यात्मिक प्रगती करायची असेल; माझ्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची असेल; माझ्याशी एकरूप व्हायचे असेल, माझ्यावरची श्रद्धा, भाव वाढवायचा असेल, त्यांनी माझ्यासाठी पुढील गोष्टी केल्यास त्यांचा याच जन्मात उद्धार होईल. त्यांचा मनुष्य जन्म सार्थकी लागेल’, असे मी भक्तांना वचन दिले आहे. आज मी तुला सांगणार असलेल्या वचनांपैकी काही वचने तू कृतीत आणलीस की, तुझी प्रगती वेगाने होईल. तुला माझ्या अस्तित्वाची अनुभूती यायला वेळ लागणार नाही, तर मग ऐक. 
अ. शोभाकाकू, तू माझ्यासाठी कुणीतरी होऊन बघ, नाही तुला मौल्यवान केले, तर सांग.
आ. माझ्या दिशेने पाऊल उचलून तर बघ, म्हणजे माझ्यावर विश्‍वास आणि श्रद्धा ठेवून तुला अशक्य वाटणारे प्रयत्न करण्यासाठीसुद्धा तू केवळ पाऊल उचल, नाही तुझ्यावर लक्ष ठेवले, तर सांग. मग नाही तुझ्या साहाय्याला धावून आलो तर सांग.
इ. माझ्या सेवेसाठी तू अखंड तत्पर राहून तर बघ. बाकी वैयक्तिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक त्रासाची काही काळजी करायला नको. तू केवळ माझ्या सेवेचाच विचार कर. नाही तुला सर्व काळजी, चिंता यांतून मुक्त करून शांतीदूत बनवले, तर सांग.
ई. शोभाकाकू, तू स्वतःला, म्हणजे तुझे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांना मला अर्पण कर. शरीर, मन, बुद्धी यांचा कसला विचार, अडथळा येऊन न देता केवळ माझ्यावर श्रद्धा ठेवून स्वतःला माझ्या चरणांवर संपूर्ण अर्पण कर. नाही तुला प्रसिद्धी मिळाली, तर सांग. मग तू माझ्या भक्तीसाठी ओळखली जाशील.
उ. माझ्या आठवणीने माझ्याकडे येण्यासाठी तू अश्रू ढाळून तर बघ, नाही तुझे जीवन आनंदाने भरले तर सांग.
ऊ. शोभाकाकू, माझी भक्ती आणि साधना करत असतांना तुझ्या जीवनात मनाविरुद्ध प्रसंग घडतील, मनात नकारात्मक विचार येतील, तुला कटू शब्द झेलावे लागतील; पण तू माझ्यासाठी कटू शब्द झेलशील, तर तुझ्यावर माझ्या कृपेची भरभरून उधळण होईल. 
     ही माझी वचने लक्षात ठेवून प्रयत्न करत जा. जसजशी तू प्रयत्न करशील, प्रयत्न वाढवशील, तसतशा तुला माझ्या साहाय्याच्या अनुभूती येतील. तू अशीच शरणागतीने प्रार्थना करत जा. मीच येत जाईन तुुुुुुला मार्गदर्शन करायला.
सौ. शोभाकाकू : कृष्णा, मी आजपासून तू सांगितलेले प्रयत्न करीन. तसे प्रयत्न होण्यासाठीही तू मला आशीर्वाद दे. 
सौ. शोभा कौलकरकाकू यांना धान्य निवडणे सेवा आणि स्वयंपाकघर येथील त्यांच्या सहसाधिकांकडून वाढदिवसानिमित्त नमस्कार !
सनातन परिवाराकडूनही हार्दिक शुभेच्छा ! 
श्रीकृष्णाकडून सौ. शोभाकाकूंना शुभाशीर्वाद !’
- कु. दीपाली पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१२.२०१३)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn