Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

२५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे होणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेना आणि भाजप यांच्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा !

     जळगाव येथे शिवतीर्थ पटांगणात २५ डिसेंबर या दिवशी विशाल धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने विविध लोकप्रतिनिधींना भेटून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे.
डावीकडून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता पोळ, सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे यांच्याकडून निमंत्रण स्वीकारतांना जळगाव शहराचे महापौर श्री. नितीन लढ्ढा आणि सनातनचे श्री. रवींद्र हेम्बाडे 

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. चंदुलाल पटेल (उजवीकडे) यांना सभेचे निमंत्रण देतांना सनातनचे पू. नंदकुमार जाधव आणि सोबत सनातनचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे 

पाचोरा (जळगाव) येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोराआप्पा पाटील (१ क्रमांक) यांना निमंत्रण देतांना डावीकडून सौ. किरण वाघुळदे, श्री. दत्तात्रेय वाघुळदे आणि सनातनचे पू. नंदकुमार जाधव 

निवेदन स्वीकारतांना (डावीकडे) जळगाव शहर भाजप आमदार श्री. सुरेश भोळे (राजूमामा), हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय बडगुजर, सनातनचे पू. नंदकुमार जाधव, श्री. वाघुळदेे आणि हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn