Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती 
निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी 
यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे ! 
       १३.१२.२०१६ या दिवशी दत्तजयंती आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारे हिंदी विशेष धर्मसत्संग सिद्ध करण्यात आले आहेत. या धर्मसत्संगांतर्गत अध्यात्मशास्त्र या विषयाचे २ धर्मसत्संग आहेत. या सत्संगांचा कालावधी २८ मिनिटे आहे. 
       या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे. 
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.
३. सध्या सर्वत्र चालू असलेल्या सभा, अधिवेशने यांमधून जोडल्या जाणार्‍या धर्माभिमान्यांना हे धर्मसत्संग आसपासच्या गावांत दाखवण्याची सेवा द्यावी.
४. समाजातील कार्यक्रमांमध्येही हे धर्मसत्संग दाखवण्याचे नियोजन करू शकतो.
       धर्मसत्संग एम्.पी.४ (MP4) फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. वाचक, हिंदुत्वनिष्ठ किंवा हितचिंतक यांना हे धर्मसत्संग आपल्या गावात, संघटनेत, स्थानिक मंदिरात, तसेच इतरत्र दाखवायचे असल्यास त्यांनी केंद्रातील उत्तरदायी साधकाकडून ती लिंक घ्यावी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn