Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तपोधाम (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) परिसरामध्ये ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेली मोठी आग शमण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांच्या सांगण्यानुसार ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या ४ साधकांनी मंत्रपठण करणे

   ‘२५.११.२०१६ या दिवशी सकाळी ११.४५ वाजता तपोधाम परिसरामध्ये एक-दीड किलोमीटर अंतरावर विद्युत् वाहिनीच्या ‘शॉर्ट सर्किट’मुळे मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचा निरोप एका साधिकेने प.पू. पांडे महाराज यांना कळवला. त्यानंतर प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्यानुसार ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या प्रत्येक साधकाने कोणता मंत्र किती वेळ म्हटला, ते पुढे देत आहे. मंत्रपठण चालू केल्यापासून मंत्रजपाची अपेक्षित संख्या पूर्ण होण्यापूर्वी दुपारी २.१० वाजता तपोधाम परिसरातील आग शमल्याने मंत्रपठण थांबवण्यात आले.
१. श्रीमती सत्यवती दळवी (पातळी : ६७ टक्के)
(दुपारी १२.३० ते दुपारी २.१०) अपेक्षित जपसंख्या : १००८
सौम्यानि यानि रूपाणि त्रैलोक्ये विचरन्ति ते ।
यानि चात्यर्थघोराणि तै रक्षास्मांस्तथा भुवम् ॥ - श्रीदुर्गासप्तशती, अध्याय ४, श्‍लोक २६
२. श्री. माधव गाडगीळ (पातळी : ६७ टक्के)
(दुपारी १.०० ते दुपारी २.१०) उपासना : १०८ वेळा,
नैवेद्य : मध
स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो
निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः । - सौंदर्यलहरी, श्‍लोक ३०
३. श्री. बलभीम येळेगावकर (पातळी : ६७ टक्के)
(दुपारी १.१५ ते दुपारी २.१०) आपत्ती आणि संकट दूर होण्यासाठी - अपेक्षित जपसंख्या : १००८
ॐ नतेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ (श्रीदुर्गासप्तशती, अर्गलास्तोत्र, श्‍लोक ७)
४. सौ. सुलोचना जाधवआजी (पातळी : ६३ टक्के)
(दुपारी १.२० ते दुपारी २.१०) : अग्नी शांत होण्यासाठी - अपेक्षित जपसंख्या : १००८
ॐ शान्ते प्रशान्ते सर्वाग्निज्वलाय स्वाहा । सर्वक्रुद्धोपशमनि ॥’
- सौ. आनंदी पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn