Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केरळच्या कम्युनिस्टांची सरकारकडून कर्नाटकातील पर्यटक वाहनांची करवाढीद्वारे लूट !

मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी काही करतील का ?
शबरीमला यात्रेकरूंना भुर्दंड ! 
   थिरुवनंतपुरम् - केरळ राज्यात मे २०१६ पासून साम्यवाद्यांचे सरकार आल्यानंतर कर्नाटक राज्यातून केरळमध्ये प्रवेश करणार्‍या अखिल भारतीय परवानाधारक पर्यटक वाहनांना भरमसाठ कर लावण्यात येत आहे. कर्नाटक राज्यातून केरळमध्ये प्रवेश करणार्‍या इनोव्हा गाडीला 
   २५ सहस्र रुपये भरावे लागतात, तर टेम्पो ट्रॅव्हलरला १ लक्ष रुपये भरावे लागतात. त्यामुळे शबरीमला यात्रेकरूंना मोठा भुर्दंड बसत आहे. बरेच यात्रेकरू कर्नाटक-केरळ सीमेवर अडकून पडले आहेत, तर खूप पैसे भरावे लागत असल्याने काहींनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. (हिंदू यात्रेकरूंची सतावणूक करणारे केरळच्या कम्युनिस्टांचे हिंदुद्रोही सरकार ! - संपादक) 
   केरळ सरकारच्या भरमसाठ करवाढीच्या निर्णयाची कल्पना नसल्याने उत्तर कर्नाटक आणि इतर काही जिल्ह्यांतील यात्रेकरूंची मोठी गैरसोय झाली आहे. (मुसलमानांना हज यात्रेसाठी अनुदान दिले जाते, तर हिंदु यात्रेकरूंना अनुदान सोडाच, उलट अस्तित्वात असलेल्या शुल्कामध्येही वाढ सहन करावी लागत आहे ! - संपादक )
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn