Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या दणक्याने लोकमतची क्षमायाचना !

  • वारकर्‍यांनो, याचप्रकारे हिंदु धर्मावर होणार्‍या प्रत्येक आघाताचा सनदशीर मार्गाने निषेध करून तो परतवून लावा !
  • संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भातील अयोग्य लिखाण प्रसिद्ध केल्याचे प्रकरण !
         सांगली - दैनिक लोकमत या वृत्तपत्राने १७ डिसेंबर या दिवशी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या शैलीचा वापर करून ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या संदर्भातील अत्यंत आक्षेपार्ह असे लिखाण प्रसिद्ध केले होते. संतशिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात अशा प्रकारे आक्षेपार्ह लिखाण प्रसारित होताच, महाराष्ट्रात वारकर्‍यांसह तमाम भाविक समाजात संतापाची लाट पसरली. वारकर्‍यांच्या अनेक फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप गटात याचा निषेध चालू झाला. यात अनेकांनी दूरभाष करून दैनिक लोकमतच्या कार्यालयात निषेध नोंदवला. अनेकांनी लोकमतच्या बहिष्काराचेही आवाहन केले. अखेर दैनिक लोकमतने नमते घेत रविवार, १८ डिसेंबरच्या अंकात या संदर्भात लेखी खुलासा करून जाहीर क्षमायाचना केली. संतप्त प्रतिक्रिया ज्या भागात उमटल्या त्यात विशेषकरून आळंदी, भोसरी, देहू, चाकण, पंढरपूर यांसह वारकर्‍यांची संख्या अधिक असणार्‍या जिल्ह्यातून प्रतिक्रिया होत्या. सांगली जिल्ह्यात श्रीसंत सेवा वारकरी सांस्कृतिक प्रतिष्ठान, सांगलीवाडी यांनीही याचा निषेध केला.
         लोकमतने केलेली क्षमायाचना पुढीलप्रमाणे - शनिवार १७ डिसेंबरच्या लोकमतच्या संपादकीय पानावर जराशी गंमत समाजमाध्यमांची या सदरच्या अंतर्गत प्रसिद्ध लिखाणाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांची बदनामी करण्याचा किंवा अवहेलना करण्याचा कोणताही हेतू नव्हता; परंतु या मजकुरामुळे वारकरी समाज तसेच आणखीही मोठा वर्ग कष्टी आणि संतप्त झाल्याचे आम्हाला कळवले आहे. त्याविषयी आम्ही दिलगीर आहोत. - संपादक, लोकमत
         (दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेले पुढील लिखाण वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले असून कोणाच्याही भावना दुखावणे हा हेतू नाही ! - संपादक)
आक्षेपार्ह लिखाण
         तुका म्हणे जीवा लागलीसे न्यू इयरची आस, अ‍ॅडमीन देससे पार्टी ऐसा होतसे भास अ‍ॅडमीनचे उत्तर तुका म्हणे ऐसा लोभ न करावा नोटबंदी असल्याकारणाने आपला बंदोबस्त आपणच करावा
लोकमतचा हिंदु आणि मुसलमान 
यांच्या प्रतीचा पक्षपातीपणा जाणा !
         २९ नोव्हेंबरला इसिसचा पैसा या लेखाच्या संरचनेमध्ये वापरलेल्या अरबी शब्दांमुळे तमाम मुसलमान बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या गंभीर चुकीविषयी लोकमत गंभीर दुःखी असून त्याविषयी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. केवळ अनवधानाने ही चूक झाली असून कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. कधीही नव्हता आणि नसेल. लोकमतने नेहमी सर्वधर्मसमभाव यावर विश्‍वास ठेवला आहे. झालेल्या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे, अशा आशयाचा मोठ्या चौकटीत लांबलचक खुलासा लोकमतने मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर मागील वर्षी केला होता, तर या हिंदूंच्या संदर्भातील चुकीविषयी केवळ शेजारी दिल्याप्रमाणे असा अत्यंत संक्षेपी खुलासा केला आहे. (हिंदु संघटित नसल्याचाच हा परिणाम आहे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn