Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधिकेला नामजप करतांना स्वतः वृंदावनात श्रीकृष्णासमवेत असल्यासंबंधी एक दृश्य दिसणे

कु. सोनम फणसेकर
१. दुपारी डोळे मिटून नामजप करतांना ‘वृंदावनात 
बसलेल्या श्रीकृष्णाच्या जवळ स्वतः लहान मुलीच्या 
रूपात आहे आणि श्रीकृष्ण १० वर्षांच्या एका तेजस्वी अन् सात्त्विक मुलाला 
जवळ घेऊन त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवत आहे’, असे दृश्य दिसणे
    ‘मी प्रतिदिन दुपारी नामजप करायला बसते. एकदा डोळे मिटून नामजप करतांना मला एक दृश्य दिसले, ‘वृंदावनात श्रीकृष्ण बसला होता. त्याने सोन्याची आभूषणे आणि सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केली होती. मी श्रीकृष्णाच्या जवळ लहान मुलीच्या रूपात (उमाक्कांच्या चित्रातील लहान मुलीप्रमाणे) होते. तिथे साधारण १० वर्षांचा एक मुलगा आला. त्याने पांढरा-शुभ्र सदरा आणि पायजमा घातला होता. तो अतिशय तेजस्वी आणि सात्त्विक दिसत होता. तो आल्यावर श्रीकृष्ण उभा राहिला. नंतर कृष्णाने त्या मुलाच्या डोक्यावरून आणि पाठीवरून प्रेमाने हात फिरवून त्याला जवळ घेतले. मी त्या मुलाभोवती गोल फिरून ‘हा कोण आहे ? किती तेजस्वी आहे ?’, असा विचार करत त्याचे निरीक्षण केले.
२. कृष्णाने उचलून १० वर्षांच्या मुलाच्या हातात दिल्यानंतर रडतच ‘मी तुझ्याकडेच 
रहाणार’, असे सांगणे आणि मग कृष्णाने समजावत ‘‘बरं, माझ्याकडेच रहा’ असे म्हणणे
     त्यानंतर मी कृष्णाच्या जवळ गेले. कृष्णाने मला उचलून घेतले आणि नंतर त्या लहान मुलाच्या हातात दिले. त्या मुलाने मला उचलून घेतले. तेव्हा मी रडायला लागले की, मला कृष्णाकडेच जायचे आहे आणि मी पुन्हा कृष्णाच्याच दिशेने झेप घेतली. त्या वेळी कृष्णाने मला पुन्हा कडेवर घेतले. मी रडतच कृष्णाला म्हणाले, ‘मी तुझ्याकडेच रहाणार.’ त्यानंतर श्रीकृष्ण मला समजावत म्हणाला, ‘बरं, माझ्याकडेच रहा !’
- कु. सोनम फणसेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२२.९.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn