Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

तुर्कस्थानमधील गावात झालेल्या उल्कापाताने गावकरी श्रीमंत झाले !

व्हॉट्सऍप इत्यादी सामाजिक संकेतस्थळावर ‘स्टोन रेन’ या नावाने ‘व्हिडिओ’ व्हायरल !
     अंकारा (तुर्कस्थान) - सध्या व्हॉट्सऍप, ट्विटर, यू ट्यूब इत्यादी सामाजिक संकेतस्थळांवर तुर्कस्थानमध्ये ‘स्टोन रेन’ अर्थात् दगडांचा पाऊस झाला, या घटनेचा ‘व्हिडिओ’ ‘व्हायरल’ (मोठ्या प्रमाणात प्रसारित) होत आहे. प्रत्यक्षात या घटनेला ‘स्टोन रेन’ असे न म्हणता वैज्ञानिकदृष्ट्या याचे कारण वेगळे आहे. २ सप्टेंबर २०१५ या दिवशी आकाशात झालेल्या उल्कापाताचे लहान मोठे तुकडे तुर्कस्थानमधील बिंगोल राज्यात वसलेल्या सारीसिसेक या छोट्याशा गावात पडले होते. या उल्कापातातून पडलेल्या तुकड्यांना सोन्याचा भाव आला असून अनेक गावकर्‍यांचे दारिद्य्र कायमचे दूर झाले. सदर व्हिडिओ हा त्याच घटनेचा आहे.
     ब्लूमबर्ग या विदेशी वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या बातमीनुसार सहसा एखादी उल्का पृथ्वीच्या कक्षेत आली की, ती जळून जाते आणि तिचे राखेत रूपांतर होते. काही वेळा उल्केचे मोठे तुकडे पृथ्वीवर आदळतात; मात्र एकतर ते समुद्रात पडतात किंवा जंगलात, पर्वतावर किंवा निर्जन स्थळी पडतात. २ सप्टेंबर २०१५ या दिवशी मात्र आकाशात झालेल्या उल्कापाताचे तुकडे आकाराने अगदी लहान होते आणि ते गावात घरांवर अन् रस्त्यांवर पडले. ही बातमी कळताच हे तुकडे खरेदी करण्यासाठी अनेक लोक या गावाकडे धाव घेऊ लागले. अनेक प्रयोगशाळांना संशोधनासाठी हे तुकडे हवे होते. या उल्का मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या मार्गात असणार्‍या कोणत्याही लघुग्रहाच्या असू शकतात. त्यामुळे रशिया, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका येथील अनेक भूभौतिकी आणि अवकाशशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ हे तुकडे खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले. या तुकड्यांचे मोल प्रती ग्रामला ६० डॉलर (अनुमाने ४ सहस्र रुपये) एवढा झाला. (सोन्याचा भाव १ ग्रॅममागे अनुमाने ३ सहस्र रुपये इतका आहे.) या संधीचा लाभ उठवून येथील गावकर्‍यांनी बरीच माया गोळा केली. अनेकांनी नवी घरे बांधली, चारचाकी वाहने घेतली आणि हज यात्राही केली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn