Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

मलकापूर येथे धर्मांधांनी देशविरोधी आणि जातीय तेढ निर्माण होणार्‍या घोषणा दिल्याने जातीय दंगल : १५ दुकाने आणि २ वाहने पेटवली !

धर्मांधांनी जाळलेले दुकान

  • हिंदुबहुल देशात धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमणे व्हायला हा पाक आहे का ? हिंदूंनो, धर्मांधांकडून होणारी आक्रमणे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
  • मलकापूर (जिल्हा बुलढाणा) येथील घटना !
  • दगडफेकीत भाजपचे आमदार चैत्रसुख संचेती यांसह ३५ जण घायाळ !
  • ८ वाहनांची तोडफोड : शहरात १४४ कलमासह संचारबंदी लागू !
         मलकापूर, १३ डिसेंबर - येथे १२ डिसेंबर या दिवशी महंमद पैगंबर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी साळीपुरा भागात दुुचाकीस्वार धर्मांध तरुणांच्या जमावाने देशविरोधी आणि जातीय तेढ निर्माण होईल, अशा चिथवणीखोर घोषणाबाजी करत फेरी काढली. त्यांना काही जणांनी अटकाव करताच धर्मांधांनी हिंदूंच्या घरांवर आणि हिंदूंवर दगडफेक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी धर्मांधांवर दगडफेक केली. दोन्ही गट समोरासमोर येऊन दगडफेक करण्यात आल्याने शहरात जातीय दंगल उसळली. धर्मांधांनी जाळपोळ आणि तोडफोड केली. धर्मांधांनी १५ दुकानांसह ऑटो आणि मालवाहू बोलेरो वाहन पेटवून दिले, तसेच ८ ते १० दुचाकी आणि ६ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. (वारंवार दंगल घडवणे, दंगलीत हिंदूंच्या घरांवर आणि हिंदूंवर दगडफेक करून त्यांच्या मालमत्तेची हानी करणे, महिलांचा विनयभंग करणे, असे प्रकार नित्याचेच झाले असल्याने या धर्मांधांना अद्दल घडवण्यासाठी संघटित व्हा ! - संपादक)
दंगलीत १५ दुकाने आणि 
१० दुचाकी वाहनांची तोडफोड !
         १२ डिसेंबर या दिवशी सकाळी १० वाजता अनुमती नसतांना ८० ते १०० धर्मांधांनी दुचाकींवर हिरवे झेंडे लावून सालीपुरा प्रभागातील ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील भागात धुडगूस घालत प्रवेश केला.
         त्यामुळे या धर्मांधांना काही नागरिकांनी हटकल्याने वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यावसन दंगलीत झाले. हिंदु आणि धर्मांध यांनी समोरासमोर येऊन एकमेकांवर दगडफेक, लुटालूट, लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. (अनुमती नसतांना धर्मांधांनी फेरी काढल्यावर पोलिसांनी त्यांना लगेचच का अटक केली नाही ? पोलिसांनी धर्मांधांना कह्यात घेतले असते, तर पुढील दंगलीचा अनर्थ टळला असता. धर्मांधांना पोलीसच घाबरत असल्याने ते हिंदूंचे रक्षण कसे करणार ? यासाठी हिंदूंनी संघटित होऊन या धर्मांधांच्या विरोधात वैध मार्गाने लढले पाहिजे ! - संपादक)
दगडफेकीत आमदार चैत्रसुख 
संचेती यांसह ३५ जण घायाळ !
         जमावाला शांत करण्यासाठी भाजपचे आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, नगराध्यक्ष आणि अधिवक्ता हरिष रावळ, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सोळंके, साहाय्यक पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस हवालदार प्रमोद राऊत, दंगलनियंत्रण पथकातील ७ जवान गेेले असता त्यांच्यावर दगडफेक झाल्याने यात हे अधिकारी आणि कर्मचारी यांसह ३५ जण घायाळ झाले. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मुख्य रस्त्यावरून फेरीस अनुमती 
नसतांनाही धर्मांधांनी जबरदस्तीने फेरी काढली !
         सदर भागातून धर्मांधांना फेरी काढण्यास अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी जुन्या गावातील नागरिक, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ३ ते ४ दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाकडे केली होती. यामध्ये पोलीस प्रशासनाने हिंदुबहुल वस्तीमधून या फेरीला अनुमती नाकारत शहरातील काही मुख्य रस्त्यावरून अनुमती दिली होती. यामध्ये दुचाकीफेरीला कोणतीही अनुमती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. (प्रतिवर्षी धर्मांधांकडून पूर्वनियोजित दंगली घडवण्याचे प्रकार सर्रास घडत असतांना पोलीस धर्मांधांवर कठोर कारवाई का करत नाहीत ? अनुमती नसतांना फेरी काढणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन पोलिसांकडे पाठपुरावा केला पाहिजे ! - संपादक)
धर्मांधांसह हिंदु 
तरुणांनाही कह्यात घेतले !
         सुरक्षेच्या दृष्टीने शहरात दंगाकाबू पथक, पोलीस कुमक, एस्आर्पी पथकासह अतिरिक्त पोलीस दल पाचारण करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय नाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेंद्र सोळंके आमदार, नगराध्यक्ष यांसह नगरसेवक विजयकुमार जाधव, श्यामकुमार राठी, शिवसेना शहरप्रमुख किशोर नवले, तालुकाप्रमुख अरुण अग्रवाल, अशांतभाई वानखेडे, रामभाऊ झांबरे, राजू पाटील, अनिल बगाडे, गजेंद्रसिंह राजपूत, पत्रकार रमेशभाऊ उमाळकर यांसह अनेक समाजसेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी शहरात फिरून नागरिकांना शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सायंकाळपर्यंत कोणत्याही प्रकारचे गुन्हे प्रविष्ट केलेले नसले, तरी पोलिसांनी विविध भागांतून संशयित धर्मांध आणि हिंदु तरुण यांना कह्यात घेण्याचे सत्र चालू केले होते. (दंगली धर्मांधांनी घडवायच्या आणि अधिकतर कारवाई मात्र हिंदूंवर करायची, हे पोलिसांचे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दंगली घडवणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! - संपादक)
जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तात वाढ !
         या घटनेचे पडसाद जिल्ह्यात पसरताच जिल्हा प्रशासनाने दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस कुमक यांना पाचारण केले. याविषयी जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांसह इतर मान्यवरांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. भाजपच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी घायाळांची मानस रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमदार श्री. चैनसुख संचेती यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. (नुसता आढावा घेऊन हिंदूंच्यावरील अत्याचार काही संपले आहेत का ? गेल्यावर्षी हिंदूंच्यावर असेच आक्रमण झाल्यानंतर मालमत्तेची हानी झालेल्या हिंदूंना अजूनही शासनाकडून साहाय्य मिळाले नाही. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्यांच्याकडे हिंदूंच्या संरक्षणाची मागणी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदूंवर झालेल्या अन्यायाविषयी संसद आणि विधानसभा येथे आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे ! - संपादक)
पोलीस आणि महसूल प्रशासनाबरोबरच 
अनुमतीसाठी आग्रह धरणारे काँग्रेस नेते आजच्या 
परिस्थितीला उत्तरदायी ! - भाजपचे आमदार चैनसुख संचेती
         मलकापूर शहरामधये आज जो अनुचित प्रकार घडून हिंदू-मुस्लीम बांधवांमध्यये तणाव निर्माण झाला. याविषयी मागील वर्षी जिल्हाधिकाारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह महसूल प्रशासनाला हजरत महंमद पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीला जुन्या गावांमधून अनुमती देण्यात येऊ नये, अशा मागणीचे जवळपास ३ सहस्र सर्वपक्षीय नागरिक, हिंदुत्ववादी संघटना यांनी माझ्या नेतृत्वाखाली दिले होते. त्यावर प्रशासनाने पाहिजे, त्या प्रमाणामध्ये लक्ष दिले नाही; मात्र यावर्षी पुन्हा गेल्या ३ दिवसांपासून विविध संघटना, नागरिक आणि विशेषतः मुस्लीम बांधवांनीसुद्धा फेरीला अनुमती देऊ नये, अशा लेखी मागण्या केल्या होत्या; मात्र काँग्रेस नेत्यांच्या आग्रहास्तव आणि त्यामध्ये ८० टक्के हिंदुबहुल वस्तीचा भाग वगळून पोलीस प्रशासनाने अनुमती दिली. तरीही पोलीस प्रशासनाने गेल्या ३ वर्षांचा आढावा घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची मिरवणुकीला अनुमती न देण्याची निवेदने असतांनाही या फेरीला अनुमती दिली. त्यामुळेच मलकापूरची परिस्थिती आज दंगलसदृश्य निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसत असून संपूर्ण गाव बंद झाल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम दिसून आला. या सर्व घटनाक्रमाला पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि अनुमतीसाठी आग्रह धरणारे काँग्रेस नेतेच याला उत्तरदायी असल्याचा स्पष्ट आरोप भाजपचे आमदार श्री. चैनससुख संचेती यांनी पत्रकार परिषदेत केला.
काही टारगट तरुणांमुळेच शहरातील वातावरण 
तणावपूर्ण होत आहे ! - नगराध्यक्ष आणि अधिवक्ता हरीश रावळ
         काही टारगट तरुणांनी मोटारसायकल फेरीची अनुमती नसतांनाही शहरातील वातावरण खराब होण्याच्या उद्देशाने शहरातून हिंदुबहुल वस्त्यांमधून मोटारसायकली पिटाळत त्याठिकाणी वातावरण खराब करण्याचा प्रकार करून दगडफेक करण्यास प्रारंभ केला असता दोन्ही समाजातील लोक एकमेकांसमोर उभे ठाकले. तेव्हा याविषयाची माहिती मिळताच आम्ही त्याठिकाणी जाऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले. टारगट तरुणांनी जाणूनबुजून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारानंतर दिवसभर शहरात घडलेले पडसाद पहाता हे सर्व निंदनीय आहे. मी याचा निषेध करतो. तसेच शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाल्यामुळे अपकीर्त करण्याचा कुटील डाव विरोधकांचा असून मलकापूर शहरातील जनतेने शांतता आणि सुव्यवस्थता कायम राखावी, असे आवाहन नगराध्यक्ष आणि अधिवक्ता हरीश रावळ यांनी केले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn