Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

करीना सैफ अली खान यांनी त्यांचा मुलाचे नाव तैमूर ठेवल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार

हिंदुबहुल देशात तैमूरसारख्या क्रूरकर्म्यांचे उदात्तीकरण होते, हे संतापजनक !
     मुंबई - भारतीय अभिनेत्री करीना कपूर-खान आणि त्यांचे पती अभिनेते सैफ अली खान यांनी त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले आहे. त्यामुळे सामाजिक संकेतस्थळांवरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. क्रूर आणि लक्षावधी हिंदूंचा वंशसंहार करणार्‍या तैमूर लंग याच्याशी नामसाधर्म्य असल्यामुळे तैमूर हे नाव ठेवल्याविषयी भारतीय आणि विदेशी अचंबित झाले आहेत.
     पाकिस्तानी वंशाचे लेखक तारेक फतेह यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर लिहिले आहे की, एक तर तुम्ही अज्ञानी आहात, नाही तर घमेंडखोर. मुलाचे नाव तैमूर ठेवून तुम्ही असे केले आहे की, तो भारतियांचे नरसंहार करणारा म्हणून ओळखला जावा.      काही नेटीझन्सने म्हटले आहे की, तैमूर एक हत्यारा होता. एका हल्लेखोराचे हे नाव आहे. असे नाव एखाद्या बाळाला देणे म्हणजे अत्याचारी राजाचे समर्थन करणे आहे.
क्रूरकर्मा तैमूर लंगच्या अत्याचारांची थोडक्यात माहिती
१. तैमूर हा उझबेकिस्तानचा लुटारू शासक होता. वर्ष १३६९ मध्ये समरकंदचा राजा झाला होता.
२. वर्ष १३८० मध्ये त्याने बगदादवर आक्रमण करून सहस्रो लोकांची कत्तल केली होती.
३. हिंदु कुश पर्वतरांगांना ओलांडून मुलतान, लाहोर, इस्लामाबादला लुटत तैमूरने सिंधू नदी पार करून पंजाबमध्ये प्रवेश केला आणि क्रौर्याची नवी कहाणी चालू झाली.
४. पानिपतमध्ये तैमूरच्या हिंस्त्र वृत्तीने परिसीमा गाठली. तैमूरने आपल्या ४० सहस्र सैनिकांना प्रत्येकी २ मुंडकी आपल्यासोबत आणण्याचा फतवा काढला आणि त्यामुळे उत्तर भारतात जणू महाहत्याकांडाला प्रारंभ झाला. तैमूरने कैद केलेल्या १ लाख हिंदु सैनिकांची तर एकाच दिवशी सामूहिक हत्या केल्याचेही इतिहासकार सांगतात.
५. तैमूरच्या या थैमानाने उत्तर भारतातली जणू मानवी वसाहतच नष्ट झाली. गावे बेचिराख झाली, पीके नष्ट झाली. संस्कृत्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक पिढ्या, व्यापार ठप्प झाले.
६. तैमूरने पळवून आणलेल्या हिंदु स्त्रिया आपल्या सैनिकांच्या हवाली केल्या, जिथे त्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. एका दाव्यानुसार तैमूरने आपल्या कारकिर्दीत १ कोटी ७० लाख लोकांचे शिरकाण केले. ही संख्या जगाच्या तत्कालीन लोकसंख्येच्या ५ टक्के इतकी होती.
७. तैमूर हा क्रूरकर्मा चंगेज खानला आपला आदर्श मानत असे. त्यामुळे जे चंगेज खानला जमले नाही, ते तैमूरला करून दाखवायचे होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn