Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सांगली जिल्ह्याचा ऑक्टोबर २०१६ मधील सनातन संस्थेच्या कार्याचा आढावा

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
१. दीपावलीनिमित्त विविध माध्यमांतून केलेला धर्मप्रसार
अ. प्रवचने : १२ ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. यांमध्ये दीपावलीची माहिती सांगण्यात आली. १६५ जिज्ञासूंनी या प्रवचनांचा लाभ घेतला. गावभाग येथे झालेल्या प्रवचनानंतर उपस्थित महिलांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
आ. विटा येथे जिज्ञासूंनी सनातन प्रभातच्या दीपावली विशेषांकांची मागणी केली. 
इ. फटाक्यांच्या विरोधात निवेदने देण्यात येणे : फटाक्यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, ६ पोलीस ठाणी, १४ शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली.
ई. आदर्श दीपावली साजरी करण्यासंदर्भात माहिती देणारी पत्रके ९ ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली.
उ. दीपावली भेट संचांचे वितरण : दीपावलीनिमित्त ४१६ संचांचे वितरण करण्यात आले.
ऊ. पत्रकार परिषदेचे आयोजन
     हिंदूंनी चिनी वस्तू आणि फटाके खरेदी करू नयेत अन् देवतांची चित्रे असलेले फटाके खरेदी करू नयेत, यासंदर्भात मिरज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याला ९ पत्रकार उपस्थित होते. या वेळी सनातनच्या सौ. मधुरा तोफखाने, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन उपस्थित होते.
२. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
     उगार येथे सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा उगार कारखान्यातील जिज्ञासूंनी लाभ घेतला. मायक्का चिंचणी येथील एका जिज्ञासूने यात्रेनिमित्त आणि प्रत्येक रविवारी सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्याविषयी विचारले. प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले.
- (सद्गुरु) कु. स्वाती खाडये, प्रसारसेविका, सनातन संस्था.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn