Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देवनार क्षेपणभूमीवर कचरा वाहून नेणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणेची उभारणी

      मुंबई, १९ डिसेंबर - देवनार क्षेपणभूमीवर कचरा वाहून नेणार्‍या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात आली आहे. यात प्रत्येक वाहनाचे वजन, वाहनाच्या क्रमांकाच्या पाटीचे छायाचित्र, येण्या-जाण्याच्या वेळा टिपण्यात येत असून या नोंदींनुसारच कंत्राटदारांना देयके देण्यात येणार आहेत. कचरा वाहून नेण्याच्या कामात कंत्राटदारांना फसवणूक, तसेच घोटाळे करता येऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संकेतस्थळाद्वारे ही माहिती जनतेसाठी उपलब्ध होणार आहे. मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमींवरसुद्धा अशा प्रकारची यंत्रणा उभारण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती घन कचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिली. (भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पाऊल उचलणार्‍या महापालिकेचे अभिनंदन ! मात्र घोटाळे करणार्‍या कंत्राटदारांच्या वृत्तीतच पालट होऊन नैतिकता असलेली जनता हा यावरील कायमस्वरूपी पर्याय असेल. यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn