Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘कॅशलेस’ (रोखरहित) व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची त्रिस्तरीय ‘लकी ड्रॉ’ योजना

   नवी देहली - ‘कॅशलेस’ (रोकडरहित) व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंदी मोदी यांनी त्रिस्तरीय ‘लकी ड्रॉ’ (भाग्यवान सोडत) योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. ८ नोव्हेंबर ते आजपर्यंत देशातील ज्या नागरिकांनी डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाइल वॉलेट यांच्या माध्यमातून व्यवहार केले आहेत, त्यांना या योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
१. या योजनेची पहिली भाग्यवान सोडत २५ डिसेंबरला काढण्यात येणार आहे. आतापर्यंत ‘कॅशलेस’ व्यवहार केलेल्या ग्राहकांमधून १५ सहस्र लोकांना निवडण्यात येईल आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी एक सहस्र रूपये जमा केले जातील.
२. दुसरी भाग्यवान सोडत ही ३० डिसेंबरला काढण्यात येईल. यातील विजेत्यांना लक्षावधी रूपयांची बक्षिसे दिली जातील.
३. यानंतर तिसरी आणि सर्वांत मोठी सोडत १४ एप्रिलला काढण्यात येणार आहे. यांतील विजेत्यांना कोट्यवधी रूपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn