Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी उत्कट भाव असणार्‍या आणि त्यांना आत्मनिवेदन करणार्‍या मलेशियातील कु. जीम टीओ !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी
झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती 
कु. जीम व्ही टीओ, क्वालालांपूर, मलेशिया येथील रहिवासी आहे. ख्रिस्ताब्द २०१३ मध्ये ती एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आली. त्या वेळी तिच्या मनात अनेक प्रश्‍न होते. हिंदु मैत्रिणीला ती त्याविषयी विचारत असे. त्यांची उत्तरे देणे हिंदु मैत्रिणीला अशक्य असल्याने मैत्रिणीच्या यजमानांनी तिला एस्.एस्.आर्.एफ्.ची लिंक दिली आणि सांगितले, ‘‘तुझ्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे इथे मिळतील.’’ ख्रिस्ताब्द २०१५ मध्ये जीमने एस्.एस्.आर.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. या काळात तिची व्याख्यान घेण्यासाठी आलेल्या सौ. श्‍वेता क्लार्क यांच्याशी ओळख झाली. तिच्या ईश्‍वराप्रती असलेल्या भावामुळे तिच्या शरिरावर आणि तिच्या घरातही दैवी कण दिसू लागले. बौद्ध धर्माची पार्श्‍वभूमी असल्याने जीमचे कुटुंबीय देवाला मानत नाही; परंतु तिला साधना करायची होती. साधना वाढवून आध्यात्मिक उन्नती करण्याच्या तळमळीपोटी ती कार्यशाळेला उपस्थित राहिली. प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा तिला स्वस्थ बसू देत नाही. कार्यशाळेला आल्यापासून तिचा प.पू. भक्तराज महाराजांप्रती (प.पू. बाबांप्रती) उत्कट भाव जागृत झाला आहे आणि तिला ते आपल्या वडिलांप्रमाणे वाटतात. ती प.पू. बाबांना आत्मनिवेदन करते. तिच्यामधे बालकभाव आहे. तिला आलेल्या काही अनुभूती तिच्याच शब्दांत पुढे देत आहे. १. सर्वसाधारणपणे डोळे बंद करून नामजप करू लागल्यावर मला नेहमी पांढरा प्रकाश दिसतो; परंतु आश्रमात यज्ञस्थळी बसून डोळे मिटून नामजप केल्यावर मला तेजस्वी लाल प्रकाश दिसला.
२. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर उभे
राहिल्यावर भावजागृती होणे आणि ‘तिथेच थांबावे’, असे वाटणे
   यज्ञ झाल्यानंतर मी सभागृहात गेले आणि प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्रासमोर नतमस्तक होऊन म्हणाले, ‘मला इथे घेऊन आलात; म्हणून मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. मी पुष्कळ आनंदात आहे; परंतु मला अश्रू आवरता येत नाहीत. बाबा, मला कार्यशाळेच्या सत्राला जायचे असल्याने मी निघते.’ मला अजून थोडा वेळ प.पू. बाबांच्या छायाचित्रासमोर त्याच स्थितीत रहायचे होते; परंतु सत्राला जायला उशीर होईल; म्हणून मी तिथून निघाले.
३. प.पू. बाबांशी बोलतांना भावावस्थेत जाणे आणि आजूबाजूचे भान न रहाणे
   त्यानंतर श्‍वेताताईने आम्हा सर्वांना कार्यशाळा चालू असलेल्या सभागृहात बोलावले. स्वागतकक्षाजवळून जातांना मला प.पू. बाबांचे छायाचित्र दिसल्यावर मी त्यांना नमस्कार केला. त्या वेळी पुन्हा माझा भाव जागृत होऊन मी रडू लागले. भावावस्थेत असल्याने मला आजूबाजूचे भान राहिले नाही. माझ्या चोहोबाजूंनी शांत प्रकाश पसरल्याचे मला जाणवत होते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची तीव्र तळमळ असतांना त्यांच्याशी
भेटण्याविषयी सूक्ष्मातून बोलल्यावर त्यांचे चरण दिसणे आणि मन कृतज्ञतेने भरून येणे
    मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्याची तीव्र तळमळ होती; पण मला ही संधी मिळेल कि नाही, याची निश्‍चिती नव्हती. ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना मी प्रार्थना केली आणि सूक्ष्मातून कळकळीने त्यांना विचारले, ‘तुम्ही मला भेटाल का ?’ त्यानंतर पुन्हा डोळे मिटून मी नामजप करू लागले. त्या वेळी सूक्ष्मातून मला चरण दिसले. ते परात्पर गुरु डॉक्टरांचेच चरण असल्याचे मला जाणवले आणि मन कृतज्ञतेने भरून गेले.
५. मार्गिकेतून जातांना आनंदाने उड्या मारणे
    काल रात्री पुष्कळ थकवा आल्याने मी सारणीमध्ये चुकांची नोंद केली नव्हती. त्यामुळे आज पहाटे ५.३० वाजता उठून मी चुका लिहिण्यासाठी जाऊ लागले. मार्गिकेतून जातांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या आठवणीने आनंद होऊन मी एखाद्या लहान मुलीप्रमाणे उड्या मारू लागले.’
- कु. जीम व्ही टीओ, क्वालालांपूर, मलेशिया. (१२.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn