Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पालखी आणि झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने श्रीसेवागिरी महाराज यात्रेस प्रारंभ

     सातारा, २४ डिसेंबर (वार्ता.) - प.पू. सेवागिरी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित वार्षिक यात्रेचा प्रारंभ पालखी आणि झेंड्याच्या भव्य मिरवणुकीने झाला. २३ डिसेंबर २०१६ ते २ जानेवारी २०१७ या कालावधीत होण्यार्‍या यात्रेस महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओरीसा आणि गुजरात या राज्यांतून भाविक मोठ्या प्रमाणात येेण्यास प्रारंभ झाला आहे. शासकीय विद्यानिकेतन आणि पुसेगाव-पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा यात्रेसाठी भाविक जमत आहेत. या वर्षी भाविकांची संख्या १० ते १२ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २३ डिसेंबर या दिवशी सकाळी ८.३० वाजता श्रीसेवागिरी देवस्थानचे मठपती प.पू. सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते पालखी आणि झेंड्याचे पूजन करण्यात आले. नंतर मंदिरपरिक्रमा करून पालखीला मिरवणुकीला प्रारंभ झाला. ग्रामस्थ, भाविकांनी जागोजागी पालखीचे मनोभावे पूजन केले आणि दर्शन घेतले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn