Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाक कलाकारांच्या चित्रपटाला राज ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील

पाक आक्रमणात हुतात्मा सैनिकांच्या बलीदानाची जाण ठेवून
आता जनतेनेच पाक कलाकार असलेल्या चित्रपटांवर बहिष्कार घालून राष्ट्रप्रेम दाखवावे !
     मुंबई - पाक अभिनेत्री माहिरा खान असलेल्या अभिनेता शाहरूख खान याचा रईस हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला विरोध होऊ नये, यासाठी शाहरूख खान याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी रईस या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला आहे.      उरी आक्रमणानंतर पाक कलाकारांना मनसेचाही सहभाग होता. या वेळी पाक कलाकार फवाद खान आणि दिग्दर्शक करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटाला विरोध झाला होता; मात्र नंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. राज ठाकरे आणि करण जोहर याच्या बैठकीनंतर यावर तोडगा काढण्यात आला होता. याविषयी काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी चित्रपट निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घ्यावी लागतेय ? ते राज्यात समांतर सरकार चालवत आहेत का ?, अशी टीका केली.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn