Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे, पेण येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

विद्यार्थ्यांना खाऊ देतांना कार्यकर्ते
      पेण - ‘सनातन संस्था ठाणे’ न्यासाच्या वतीने बेलवडे येथील आदिवासी पाड्यावरील शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. उपक्रमाचा लाभ ९० विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी उपस्थित रा.जि.प. शाळा भोरकस या शाळेतील शिक्षक श्री. प्रफुल्ल सुखचैन यांनी ‘सनातन संस्था सामाजिक कार्य करण्यासह समाजाला धर्मशिक्षण देते आणि अयोग्य गोष्टींचे खंडण करून धर्मजागृती करते, हे कार्य कौतुकास्पद आहे.आपले कार्य असेच पुढे वाढत जावो’, असे सांगितले. या वेळी सनातन संस्था ठाणे न्यासाच्या वतीने सौ. वंदना आपटे यांनी मुलांना दत्त जयंती आणि दत्ताचा जप यांविषयी मार्गदर्शन केले.


धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn