Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांच्या संख्येत अचानक वाढ !

श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत नोटांची अफरातफर ?
पंढरपूर, ४ डिसेंबर - केंद्र सरकारनेे चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या दानपेटीत या नोटांची मोठ्या प्रमाणात अचानकपणे वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात आयकर विभागाने ८ नोव्हेंबरपासून मंदिर समितीचा आर्थिक ताळेबंद मागवला आहे, तर ताळेबंद सादर करण्यासाठी मंदिर समितीने मुदतवाढीची मागणी केली आहे. या संदर्भात अर्पण पेटीतील नोटांची फेरफार केल्याचा आयकर विभागाला संशय आहे.
  • विठ्ठल मंदिरात १०, ५०, तसेच १०० रुपयांच्या नोटांचे अर्पण होण्याचे प्रमाण अधिक असायचे.
  • नोटांबदीचा निर्णय घोषित झाल्याच्या दुसर्‍याच दिवसापासून दानपेटीमध्ये ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या पुष्कळ नोटा जमा झाल्याचे अधिकोषातील नोंदींवरून स्पष्ट झाले.
  • ८ नोव्हेंबर या दिवशी दानपेटीत १० लक्ष ६९ सहस्र ३८ रुपये जमा झाले होते. त्यामध्ये १ सहस्र रुपयांच्या ८१, तर पाचशे रुपयांच्या ९४० नोटा होत्या. १० आणि ११ नोव्हेंबर या दिवशी मात्र दानपेटीत १ सहस्र रुपयांच्या अनुक्रमे ४८४ आणि ९१६, तर पाचशे रुपयांच्या अनुक्रमे ३ सहस्र ३६४ आणि १ सहस्र २०० नोटा आढळून आल्या. त्या तुलनेत १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांची संख्या अल्प होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn