Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन-निर्मित दत्ताचे सात्त्विक ‘चित्र’

     प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) वा त्रिमितीय रूप (मूर्ती) हे जितके त्या देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात त्या देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट होते. देवतेचे तत्त्व रूपामध्ये जितके अधिक असते, तितका पूजकामध्ये भक्तीभाव लवकर जागृत होण्यास साहाय्य होते. अशा रूपातून देवतेची स्पंदने अधिक प्रक्षेपित होत असल्याने वातावरणही सात्त्विक बनते. सनातन संस्थेचे साधक-कलाकार अध्यात्मशास्त्रानुसार, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म स्पंदनशास्त्राचा अभ्यास करून सात्त्विक आणि त्या त्या देवतेचे अधिकाधिक तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करू शकेल, अशी चित्रे, मूर्ती आणि नामजप-पट्ट्या यांची निर्मिती करतात. सनातनने बनवलेले दत्ताचे चित्र अशाच प्रकारचे आहे. 
    कलियुगात अधिक दत्ततत्त्व असलेले चित्र : कलियुगात कोणत्याही देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांत त्या त्या देवतेचे अधिकाधिक ३० टक्केच तत्त्व येऊ शकते. सनातन-निर्मित ‘दत्ताच्या चित्रात’ २८.९ टक्के दत्ततत्त्व आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn