Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा !

कोल्हापूर येथे रणरागिणींची 
थाळीनादाद्वारे चेतावणी ! 

आंदोलनात बोलतांना सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

         कोल्हापूर, १९ डिसेंबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे १९ डिसेंबर या दिवशी ऐन तळपत्या उन्हात दुपारी १२ वाजता घेण्यात आलेल्या आंदोलनात ८० हून अधिक रणरागिणींनी थाळीनाद करत पुणे येथे होणारे सन बर्न रहित करा, अशी जोरदार मागणी केली.
हिंदु धर्मासाठी कृती करण्याची तीव्र तळमळ
असलेल्या श्री संप्रदायाच्या सौ. तिलोत्तमा नाईक !
         सौ. नाईक या आंदोलनासाठी कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर शिरोली येथून आल्या होत्या. सौ. नाईक यांची प्रकृती बरी नव्हती. असे असतांना भर उन्हात हिंदु धर्म आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्या आंदोलनासाठी उपस्थित राहिल्या. सौ. नाईक या आंदोलनासाठी शेवटपर्यंत उपस्थित होत्या, एवढेच नव्हे, तर त्या निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या.
सनबर्न रहित होईपर्यंत प्रत्येक शहर-
गाव येथे आंदोलन करा ! - कु. प्रतिभा तावरे
         या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिभा तावरे म्हणाल्या, हिंदु संस्कृतीशी कोणत्याही प्रकारे संबंध नसलेले असे फेस्टिव्हल आयोजित केल्याने समाजमनावर अयोग्य संस्कार होतात. सनबर्नसारख्या फेस्टिव्हलमुळे तरुण-तरुणी अमली पदार्थांकडे वळत आहेत. त्यामुळे जोपर्यंत सनर्बन रहित होत नाही, तोपर्यंत प्रत्येक शहर-गाव येथे आंदोलन करा.
उपस्थित मान्यवर : श्री संप्रदायाच्या सौ. तिलोत्तमा नाईक, शिवसेनेच्या सौ. स्वाती राजू यादव, श्री महालक्ष्मी देवस्थानच्या श्रीपूजक कु. ऐश्‍वर्या मुनीश्‍वर, हिंदु धर्माभिमानी कु. सिद्धी सुधाकर सुतार, सनातनच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुधाकर सुतार, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये.
भारतीय संस्कृतीशी संबंध नसलेले प्रकार 
हद्दपार करा ! - डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था
         स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने पाश्‍चिमात्त्य संस्कृतीचा पगडा वाढत आहे. यामुळेच गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नवीन वर्ष साजरा करण्याची कुप्रथा वाढीस लागली आहे. हिंदु धर्मात असलेली प्रत्येक परंपरा महान आहे. त्यामुळे हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे गुढीपाडव्यालाच साजरे केले पाहिजे. भारतीय संस्कृतीशी संबंध नसलेले ३१ डिसेंबरसारखे सर्वच प्रकार या देशातून हद्दपार करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.
         या वेळी धर्मशिक्षण वर्गातील महिला सौ. योजना सावंत, तसेच सौ. नंदिनी कुलकर्णी, सौ. वसुधा दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. शंकर शेळकंडे यांना निवेदन देण्यात आले.
संस्कृती रक्षणाच्या रणरागिणीच्या आंदोलनात 
सर्व संप्रदायांनी सहभागी व्हावे ! - सौ. तिलोत्तमा नाईक
         हिंदु धर्मात असलेले सण साजरे करण्यामागे शास्त्र आहे, याउलट पाश्‍चात्त्यांचे नवीन वर्ष साजरे होतांना राजसिक-तामसिक बाबींचा समावेश असतो. हिंदु धर्मियांनी गुढीपाडवा प्रत्येक गावागावात मोठ्या प्रमाणात साजरा करणे अपेक्षित आहे. हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा करत असलेले आंदोलन हिंदु धर्मासाठीच असल्याने संस्कृती रक्षणाच्या रणरागिणीच्या आंदोलनात सर्व संप्रदायांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संप्रदायाच्या माजी जिल्हाप्रमुख सौ. तिलोत्तमा नाईक यांनी या वेळी केले.
क्षणचित्रे
१. आंदोलनस्थळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.
२. कोल्हापूर शहरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता अमिर खान येणार होते. बहुतांश सर्वच प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. असे असूनही रणरागिणीच्या आंदोलनासाठी सर्वत्र प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी येऊन वृत्त संकलन केले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn