Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

साधनेत योग्य मार्ग मिळण्यासाठी देवाला प्रार्थना करणार्‍या आणि शिकण्याच्या स्थितीत असणार्‍या मुंबई येथील कु. नीती कौशिक !

कु. नीती कौशिक
महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या शिबिरात सहभागी झालेल्या शिबिरार्थींचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती
‘कु. नीती कौशिक या मुंबई येथील असून त्यांना त्या पूर्वी करत असलेल्या साधनेने व्यवस्थित साधना होत नसल्याचे जाणवले. माहितीजालाच्या माध्यमातून त्या ‘एस्.एस्,आर्.एफ्.’च्या संपर्कात आल्या आणि संस्थेच्या ‘लेव्हल २’ सत्संगालाही उपस्थित राहू लागल्या. त्यानंतर त्या सेवा करू लागल्या आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियाही राबवू लागल्या. आध्यात्मिक त्रास आणि स्वतःमधील दोष अन् अहं न्यून कसे करायचे, हे शिकण्यासाठी त्या या कार्यशाळेला उपस्थित राहिल्या आहेत. त्यांच्या पूर्वीच्या साधनाप्रवासाविषयी आणि त्यांना योग्य साधनेने आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. साधनाप्रवास
१ अ. पूर्वी करत असलेल्या साधनामार्गाने काहीही प्रगती न झाल्याचे जाणवणे आणि ‘आरंभापासून साधना करायची आहे, तूच मला योग्य मार्ग दाखव’, अशी देवाला प्रार्थना करणे : ‘पूर्वी मी नामजप आणि ध्यानधारणा करत होते. ‘माझी साधना व्यवस्थित होत नाही’, असे वाटू लागल्याने मी गेली २ वर्षे साधना करणे बंद केले होते. शारीरिक अडचणी आणि अल्प प्राणशक्ती यांमुळे मी चाकरी करणेही सोडले. त्यानंतर मी देवाला प्रार्थना केली, ‘मला अगदी आरंभापासून साधना करायची आहे. तूच मला योग्य मार्ग दाखव.’ माझ्यामध्ये पुष्कळ स्वभावदोष असल्याने आणि पूर्वी करत असलेल्या साधनामार्गाने काहीही प्रगती न झाल्याने मला आध्यात्मिक त्रासही जाणवू लागला होता.
१ आ. माहितीजालावर साधनेविषयी शोध घेतांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संपर्कात येणे आणि सत्संगाला उपस्थित राहून स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवू लागणे : त्यामुळे माहितीजालावर मी शोध घेण्यास आरंभ केला. त्या वेळी मी ‘एस्.एस्,आर्.एफ्.’च्या संपर्कात आले. मला होत असलेल्या त्रासांशी मिळत्या जुळत्या ‘एस्.एस्,आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील ‘केस स्टडीज्’चा मी अभ्यास केला. त्यानंतर मी नामजप करणे आणि आध्यात्मिक उपाय करणे चालू केले.
१ इ. कार्यशाळेसाठी येण्याच्या संधीची वाट पहाणे आणि ती संधी मिळणे : पुढे माझे साधनेचे प्रयत्न चांगले होऊ लागल्यावर मला ‘लेव्हल ३’ सत्संगात उपस्थित रहाण्यास सांगितले. बर्‍याच कालावधीपासून मी रामनाथी आश्रमातील कार्यशाळेसाठी येण्याच्या संधीची वाट पहात होते.
२. जाणवलेली सूत्रे
२ अ. रामनाथी आश्रमात आल्यावर मला येथील साधकांमध्ये साधनेची तळमळ आणि नम्रता जाणवली.
२ आ. सौ. राधा मलिक यांच्यामध्ये गुरूंविषयी कृतज्ञताभाव असल्याचे लक्षात येणे : आश्रमातील भोजनकक्षात मी सौ. राधा मलिक यांना म्हणाले, ‘‘तुमचे गुरुकृपा या विषयावरील सत्र मला पुष्कळ आवडले.’’ यावर त्या म्हणाल्या, ‘ते माझे सत्र नव्हते, तर गुरूंचे सत्र होते.’ यावरून ‘राधाताईमधे गुरूंविषयी किती कृतज्ञताभाव आहे’, ते माझ्या लक्षात आले.’
३. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेली अनुभूती
३ अ. यज्ञातून बाहेर पडणारा धूर पाहून आनंदाची अनुभूती येणे : काल आम्ही यज्ञस्थळी गेलो होतो. तेथे मला भगवान शंकराचे अस्तित्व जाणवले. यज्ञातून बाहेर पडणारा धूर पाहून मला आनंदाची अनुभूती येत होती. तेथून ‘परत येऊ नये’, असे मला वाटत होेते.’
- कु. नीती कौशिक, मुंबई (१२.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn