Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

येत्या निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार कागदरहित करण्याचा विचार !

नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे ७ वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित !
     मुंबई - पुढील वर्षी होणार्‍या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार कागदरहित करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.
१. सद्यस्थितीत महापालिकेच्या महासभेच्या आणि विविध समित्यांच्या कार्यक्रम पत्रिका नगरसेवकांना घरपोच पाठवल्या जातात. या कार्यक्रम पत्रिका ई-मेलने पाठवून छपाई, कागद आणि वितरण यांसाठी होणारा व्यय टाळता येणे शक्य होणार आहे.
२. वर्ष २००९ मध्ये महापालिका प्रशासनाने एक कोटी रुपये व्यय करून सर्व नगरसेवकांना भ्रमणसंगणक उपलब्ध करून दिले होते. त्यासंदर्भातील प्रशिक्षणवर्गाचेही आयोजन करण्यात आले होते; मात्र या वर्गाला निम्म्याहून अल्प नगरसेवकांनी उपस्थिती दर्शवली होती. (भ्रमणसंगणक विकत घेण्यापूर्वी त्याच्या वापराविषयी महापालिकेने अभ्यास न केल्यामुळे जनतेच्या घामाचा पैसा वाया गेला, असेच म्हणावे लागेल ! - संपादक)
३. तेव्हापासून कार्यक्रम पत्रिका ई-मेलने पाठवण्याचा महापालिकेचा प्रस्ताव प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा हा प्रस्ताव नगरसेवकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn