Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३० गावांतील कुटुंबांकडे असलेल्या देवस्थानच्या भूमीचा कर शासनाने वसूल करावा ! - आमदार मेधा कुलकर्णी

     नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांसह इतर ठिकाणी देवस्थानाच्या भूमी असून करवीरपिठाच्या भूमी त्या त्या परिसरातील ३० गावांत असलेल्या काही कुटुंबांकडून बलपूर्वक घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. भूमीचे ७/१२ देवस्थानच्या नावावर असतांना अशाप्रकारे भूमीच्या कराच्या माध्यमातून देवस्थानला मिळणारा निधी बुडवणार्‍या त्या परिसरातील व्यक्तींविरुद्ध आणि महसूल विभागातील संबंधित दोषी कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. सौ. मेधा कुलर्णी यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली. 

प्रा. सौ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, 
१. अनेक ठिकाणी देवस्थानांच्या भूमीवर कसणार्‍यांची नावे वहिवाटदार म्हणून अनधिकृतरित्या लागली आहेत. नोंदणी कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा कायद्यातील पळवाट शोधून अपमार्गाने खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खरेदी-विक्रीचे जवळपास ५ सहस्र ७१७ फेरफार महसूल विभागाच्या पाहणीत रहित झाले आहेत. 
२. करवीरपिठाच्या जगद्गुरु शंकराचार्य यांच्याकडे भूमीचा कर जमा करण्यास भूमी कसणार्‍या शेतकर्‍यांचा विरोध आहे. परिणामी देवस्थानचे विश्‍वस्त आणि जबरदस्तीने भूमी कसणार्‍या त्या परिसरातील व्यक्ती यांच्यात वर्षांनुवर्षे वादाच्या ठिणग्या पडत आहेत. 
३. त्यात महसूल विभागातील शासकीय कर्मचारी अपमार्गाचा अवलंब करून खतपाणी घालत असल्याचे निदर्शनास आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn