Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! - मलकारी लवटे

११ डिसेंबर या दिवशी असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने
 
बैठकीत मनोगत व्यक्त करतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख
      इचलकरंजी, ५ डिसेंबर (वार्ता.) - हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. मलकारी लवटे यांनी केले. सभेची माहिती देण्यासाठी श्री शिवतीर्थ सेवा संघाचे श्री. आनंद मकोटे यांच्या घरी ४ डिसेंबर या दिवशी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. श्रीशिवप्रतिष्ठानचे ज्येष्ठ धारकरी श्री. महाजन गुरुजी यांनीही या वेळी तरूणांना सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. 

      प्रारंभी श्रीशिवप्रतिष्ठानचे ज्येष्ठ धारकरी श्री. गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रीतम पवार यांनी सभेचा उद्देश स्पष्ट केला, तर श्री. किरण दुसे यांनी सध्या हिंदु धर्मावर होत असलेले आघात स्पष्ट करून सभेतून नेमके काय साध्य होणार आहे, ते सोदाहरण स्पष्ट करून सांगितले. या वेळी धर्मसभेच्या संदर्भातील ध्वनीचित्र तबकडी दाखवण्यात आली. या बैठकीसाठी ३५ हून अधिक हिंदु धर्माभिमानी तरुण उपस्थित होते. 
विशेष
  • या बैठकीसाठी श्री. विनोद ओझा यांनी दिवसभर संपर्क आणि प्रसार केला, तसेच श्री. आनंद मकोटे यांनी जागा देऊन पूर्ण बैठकीचे आयोजन केले. 
  • बैठकीनंतर चंदूर या गावी बैठकीचे आयोजन करू, असे युवकांनी सांगितले. 
  • बैठकीनंतर युवकांनी धर्मजागृती सभेनंतरही आम्हाला या कार्यासाठी मार्गदर्शन लागेल, असे सांगितले. 
  • श्री. विनोद ओझा यांनी सभेची पाच सहस्र हस्तपत्रके प्रायोजित केली आहेत. या वेळी श्री. ओझा यांनी उपस्थित युवकांना त्यांनीच प्रायोजित केलेली सनातन पंचांग भेट दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn