Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

केवळ महर्षींच्या कृपेने भ्रमणभाषद्वारे चेन्नईत संपर्क होणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्‍वस्त करणारा निरोप देता येणे

सद्गुरु (सौ). बिंदा सिंगबाळ
     ‘१२.१२.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या चक्रीवादळाने आपत्काळ निर्माण झाला होता. त्याच कालावधीत रामनाथी आश्रमात ‘कार्तिक दीपम्’च्या निमित्ताने विधी चालू असल्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चेन्नई येथील साधकांची विचारपूस करण्यासाठी आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्‍वस्त करणारा निरोप देण्यासाठी कु. प्रियांका जोशी यांना चेन्नई येथील साधिका सौ. उमा रवीचंद्रन (उमाक्का) यांना संपर्क करण्यास सांगितले. महर्षींच्याच कृपेने त्यांचा संपर्क झाला. त्या वेळी बोलतांना उमाक्का म्हणाल्या, ‘‘चेन्नईत माहितीजाल (इंटरनेट), भ्रमणभाष इत्यादी सर्व संपर्कयंत्रणा वादळामुळे ठप्प झाल्या आहेत. मी बराच वेळ साधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते; पण संपर्क होत नव्हता. केवळ तुझाच भ्रमणभाष लागला.’’ निरोप ऐकून उमाक्कांचा भाव जागृत होऊन त्यांना संत, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.      संपर्कयंत्रणा पूर्णपणे बंद असतांना आपत्काळात संपर्क करता येणे, ही केवळ महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा ! साधकांनो, ‘येणार्‍या घोर आपत्काळात देवच साधकांचे रक्षण करणार आहे’, हे चेन्नई येथे आलेल्या आपत्काळातून लक्षात येते. देवाला आपले रक्षण करावे, असे वाटण्यासाठी आपली साधना आणि देवावरील भक्ती वाढवा.’
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१६)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn