Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या ४० बँक खात्यांमध्ये ५५ कोटी रुपये जमा !

एका राज्यात नक्षलवाद्यांची एवढी खाती, तर देशभरात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !
अंमलबजावणी संचलनालयाकडून सर्व खात्यांना टाळे !
    रांची (झारखंड) - नोटाबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नक्षलवाद्यांनाही बसला आहे. झारखंडमध्ये प्रशासनाकडून नक्षलवाद्यांच्या ४० बँक खात्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे या खात्यांमधून रक्कम काढणे आणि पैसे जमा करणे यांवर बंधन आले आहे. या ४० खात्यांमध्ये अनुमाने ५५ कोटी रुपये जमा आहेत. यांतील १५ खाते कुप्रसिद्ध नक्षलवाद्यांचे असून त्यांना पकडून देणार्‍यांना पोलिसांकडून ‘बक्षिस’ घोषित करण्यात आले आहे. 
   प्रशासनाने या नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांचेही बँक खाते बंद केली आहेत. काही नक्षलवाद्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्याही आहेत. त्यांच्या खात्यांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. पाटणा येथील अंमलबजावणी संचलनालय या प्रकरणाचे अन्वेषण करत आहे. एका वृत्तानुसार नोटाबंदीच्या नंतर आतापर्यंत ५६४ नक्षलवादी आणि त्यांचे समर्थक यांनी पोलिसांच्या समोर शरणागती पत्करली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn