Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नागपूर येथे २३ डिसेंबरपासून धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभाचे आयोजन

  • वर्ष २०२५ पर्यंत भारताला जगद्गुरु बनवण्याचा उद्देश !
  • विविध संप्रदायांच्या देशातील १ सहस्र ११८ संतांचा सहभाग !
      नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) - येथील रेशीमबाग मैदानावर २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत धार्मिक आणि ऐतिहासिक विराट धर्मसंस्कृती महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. हा विराट ऐतिहासिक महाकुंभ सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. विराट धर्मसंस्कृती महाकुंभ या राष्ट्रीय सोहळ्यात भारतमातेच्या सेवेसाठी सर्वच धर्म संप्रदायांचे देशभरातील १ सहस्र ११८ संत सहभागी होणार आहेत. वैदिक आणि सांप्रदायिक असे दोन प्रकारचे संत देशभरातून एकाच वेळी एकत्र येत आहेत, हेच या महाकुंभाचे वैशिष्ट्य होय. सहा पिठांचे शंकराचार्य, इस्कॉन, नाथ संप्रदायाचे प्रमुख, बौद्ध, जैन, शीख, मुसलमान आणि किन्नर पंथाचे प्रमुखही या संमेलनाला उपस्थित रहाणार आहेत. संत क्षेत्रात दोष शिरू नये, यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासोबतच देशसेवा आणि २०२५ पर्यंत भारताला जगद्गुरु बनवण्याच्या उद्देशाने प्रथमच या भव्य महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नाथपिठाधीश्‍वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी अमरावती येथे १५ डिसेंबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्र आणि धर्म संस्कृती यांना अनुकूल उपयोग विकास करण्याची प्रतिज्ञा करण्यात येणार !
      २५ डिसेंबर या दिवशी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देशातील १ सहस्र ११८ संत देशातील लक्षावधी लोकांना राष्ट्र-संस्कृती रक्षणाची, तसेच परिवार संस्थेचा राष्ट्र आणि धर्म संस्कृतीच्या अनुकूल उपयोग विकास करण्याची प्रतिज्ञा देणार आहेत. या वेळी ज्योतिष मठाचे शंकराचार्य जगद्गुरु वासुदेवानंद सरस्वती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, श्रीनाथ पिठाधिश्‍वर जितेंद्रनाथ महाराज, काशी सुमेरू पिठाचे नरेंद्राचार्य महाराज, कर्नाटक हम्पीचे विरुपाक्ष सरस्वती महाराज, गोरक्षपिठाधीश्‍वर योगी आदित्यनाथ महाराज, रामानुजाचार्य चेन्नाजीयर स्वामी, हरियाणाचे गरीबदास आदी संत, महंत, मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
संत आणि सेना एकत्रितपणे काम करणार !
      देशाच्या संपूर्ण सीमावर्ती राज्यातील सर्व मठ, मंदिरे आश्रमांचा उपयोग आता या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांची संस्कृती, देशभावना विकसित करण्यासोबतच भारतीय सेनेचे सामर्थ्य मनोबल वाढवण्यासाठी केला जाईल, असे श्री जितेंद्रनाथ महाराज यांनी या वेळी सांगितले.

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn