Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गुजरात आणि नाशिक येथे संतप्त नागरिकांनी बँकांना टाळे ठोकले !

जनतेला नोटा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर देशात हिंसाचार
होईल, असे सर्वोच्च न्यायालयानेच म्हटले आहे, त्याचेच या घटना दर्शक होत !
      नवी देहली - गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील समधालिया गावात पैसे न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि देना बँक यांच्या खातेदारांनी बँकांना टाळे ठोकले. रविवार, १८ डिसेंबरला बँका बंद होत्या, त्यामुळे सोमवारी १९ डिसेंबरला पैसे काढण्यासाठी बँकेसमोर मोठी रांग लागली होती; परंतु रोख रक्कम नसल्याने बँकेने या सर्वांना पैसे देण्यास समर्थ नाही, असे म्हटल्याने संतप्त लोकांनी बँकेच्या खिडक्या आणि दरवाजे यांची तोडफोड केली. सलग ३ दिवस लोकांना बँकेतून पैसे मिळाले नव्हते. अशीच घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील नामपूर येथे घडली. पगाराचे पैसे मिळत नसल्याने बँक ग्राहकांनी बँकेला टाळे ठोकले. दादरा अन् नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथील एका बँकेत गेल्या ३ दिवसांपासून पैसे उपलब्ध नव्हते. येथे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संतप्त खातेदारांपासून बँकेचे रक्षण झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn