Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गंभीर आजारपणात महर्षींनी सांगितलेले उपाय आणि संतांनी केलेले उपाय वाचून कु. दीपाली मतकर हिने त्या सर्वांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

कु. दीपाली मतकर
     ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मी आजारी असतांना संतांनी माझ्यासाठी काय उपाय केले आणि महर्षींनी कोणते उपाय करायला सांगितले, याविषयीच्या धारिका मला वाचायला मिळाल्या. त्या धारिका वाचत असतांना त्या उपायांचा परिणाम माझ्यावर होत होता. महर्षी आणि सर्व संत यांनी सूक्ष्मातून केलेले उपाय यांमुळे माझे प्राण वाचल्याचे लक्षात आले आणि मन कृतज्ञतेने भरून आले.
१. पू. गाडगीळकाकांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे 
त्रास उणावून ‘काय चालू आहे’, ते लक्षात येऊ लागणे 
     ‘दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आलेल्या लेखाप्रमाणे पू. गाडगीळकाकांनी २४.१०.२०१६ या दिवशी रात्री ९.४५ ते २.३० या वेळी सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्रावर न्यास करून सूक्ष्मातून उपाय केले. आधीच्या रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी ‘इथे उपचार होणार नाहीत’, असे सांगितल्याने पू. काका उपाय करत असतांना साधक मला अश्‍विनी रुग्णालयात नेत होते. तेथील आधुनिक वैद्यांनी साधकांना सांगितलेे, ‘‘रुग्णाची स्थिती गंभीर आहे. आजार मेंदूपर्यंत जाऊ शकतो. आम्ही प्रयत्न करत आहोत; पण तुम्ही रुग्णाला पुण्याला हालवण्याच्या दृष्टीने निर्णय घ्या.’’ हे मला श्री. तानाजी गोरे (सोलापूर येथील साधक) यांच्याकडून नंतर कळले. पू. काकांनी उपाय केल्याचे वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, त्याच वेळी माझा त्रास उणावून ‘काय चालू आहे’, हे माझ्या लक्षात येऊ लागले होते. २४ तारखेच्या आधीचे माझ्यावर कोणी कोणते उपाय केले, हे मला आठवत नव्हते. 
२. त्रास वाढत असलेल्या वेळेत पू. गाडगीळकाकांनी जप करणे आणि काका करत असलेल्या 
उपायांमुळे शरिराचे कार्य व्यवस्थित चालू होऊन विस्कळीतपणा दूर होत असल्याचे जाणवणे 
     पू. गाडगीळकाकांनी ‘निर्गुण, ॐ’ चे सूक्ष्मातून मंडल घातल्यामुळे मला त्रास व्हायचा नाही. पू. काकांच्या जपाच्या वेळा पाहिल्यावर लक्षात आले, ‘ज्या वेळी त्रास वाढलेला असायचा आणि त्याच वेळी पू. काका घंटो-न्-घंटे जप करायचे.’ ‘त्यांनी केलेल्या प्रार्थनांचाही माझ्यावर परिणाम झाला’, असे माझ्या लक्षात आले. ‘माझ्या शरिराची नेमकी काय क्रिया चालू आहे’, हेच मला कळत नव्हते. ‘पू. काकांच्या उपायांमुळे शरिराचे कार्य व्यवस्थित चालू होऊन विस्कळीतपणा दूर होत आहे’, असे मला जाणवले. २५.१०.२०१६ या दिवशी पू. काकांना माझा त्रास वाढल्याचे जाणवले. त्याप्रमाणे संध्याकाळी मला जीव गुदमरल्यासारखे होत होते. पू. काकांच्या उपायांमुळे मला शक्ती आणि चैतन्य मिळत होते. 
३. पू. गाडगीळकाकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्राण आल्यासारखे वाटणे आणि महर्षींनी अपमृत्यू 
टळण्यासाठी दिलेला मंत्र वाचतांना सूक्ष्मातील युद्ध चालू असून रक्षण होत असल्याचे जाणवणे
     २७.१०.२०१६ या दिवशी पू. काकांनी लेखात दिलेल्या प्रार्थनेप्रमाणे शरिराची जडण-घडण होऊ लागली. शरिरातील रक्तवाहिन्या मृतवत् वाटत होत्या. त्यांच्यात पू. गाडगीळकाकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे त्राण आल्यासारखे वाटू लागले. महर्षींनी अपमृत्यू टळण्यासाठी मंत्र दिला होता. त्रासांची तीव्रता वाढल्यावर तो मंत्र मी वाचतांना सूक्ष्मातील युद्ध चालू असल्यासारखे वाटायचे; पण त्या मंत्रामुळे रक्षण होत असल्याचेही मला जाणवायचे.
४. ‘आयुष्यवृद्धी होम’ केल्यावर हृदयावरील दाब अल्प झाल्याचे जाणवणे 
आणि यज्ञातील शक्तीमुळे श्‍वास घेण्यातील अडथळा दूर झाल्याचे जाणवणे 
     २७.१०.२०१६ या दिवशी वेदपाठशाळेतील पुरोहित साधकांनी ‘आयुष्यवृद्धी होम’ केला. त्यानंतर मला हृदयावरील दाब अल्प झाल्याचे जाणवले. या होमाचे कु. मधुराताई भोसले हिने केलेले सूक्ष्म-परीक्षण वाचले. दुर्वांची यज्ञात आहुती दिल्यानंतर गणेशतत्त्वाचे रूपांतर वायुतत्त्वात होऊन प्राणशक्तीच्या रूपाने गणेशतत्त्व प्रवाहित झाल्याने प्रत्यक्षातही त्या दिवसानंतर मला श्‍वास घेण्यासाठी लावलेला व्हेंटिलेटर दिवसभरातून काही घंटेच लावायचे. त्याचप्रमाणे यज्ञातून प्रवाहित झालेला प्राणवायू महामृत्यूंजय मंत्राच्या उच्चाराने यमदूतांना शोषून घेता आला नाही. श्‍वास घेण्यास अडथळा वाटत होता; पण यज्ञातील शक्तीमुळे तो अडथळा दूर झाला.
५. ‘जन्मपत्रिकेनुसार भाऊबीजेपर्यंत अधिक त्रास असून त्यानंतर 
उणावेल’, असे सौ. प्राजक्ता जोशी यांनी सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे घडणे 
     सौ. प्राजक्ता जोशीकाकूंनी जन्मपत्रिकेनुसार सांगितले, ‘‘भाऊबीजेपर्यंत अधिक त्रास असेल, नंतर उणावेल.’’ त्याप्रमाणे त्रासांची तीव्रता बरीच उणावली. भाऊबीजेच्या दिवशी मला अतीदक्षता कक्षातून बाहेर आणले. श्री. विशाल शर्मा यांना मी प्रत्यक्षात पाहिलेले नाही. त्यांनी औषधे पाठवली. या जिवासाठी त्यांनी भृगु महर्षींनी प्रार्थना केली. ती केवळ प.पू. गुरुदेवांची आणि भृगु महर्षींची कृपा आहे. 
६. सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि (सौ.) गाडगीळकाकू यांनी 
महर्षींनी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्याचे वाचून मन कृतज्ञतेने भरून येणे 
आणि प.पू. गुरुदेव श्रीमत् नारायण असल्याचे साधकांच्या मनातील रहस्य महर्षींनी उलगडणे 
      महर्षींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी प्रार्थना केल्या. हे वाचून देव या जिवासाठी अखंड कृपा करत होता’, या विचाराने मन भरून आले. महर्षीनी सांगितले, ‘‘गुरूंमुळे दीपाली बरी झाली.’’ प.पू. गुरुदेव सांगतात, ‘‘महर्षींमुळे दीपाली बरी झाली.’’ हे देवरहस्य वेळ आल्यावर उलगडणार आहे; पण महर्षींनी आम्हा साधकांच्या मनातले ‘प.पू. गुरुदेवच श्रीमत् नारायण आहेत’, रहस्य उलगडले आहे. महर्षींनी सांगितलेल्या आजाराविषयीच्या लेखात २६.१०.२०१६ या दिवशीच्या नाडीवाचनात त्यांनी सांगितले आहे, ‘तुम्ही तुमची सेविका दीपालीला आमच्याकडे सोपवले आणि आम्ही त्याच क्षणी तिला श्रीमत् नारायणाच्या कोमल चरणांवर सोपवले.’ 
७. प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून 
‘कृपादृष्टी अखंड अनुभवता येऊ दे’, अशी प्रार्थना करणे 
      ‘प.पू. गुरुदेव, तुमच्या कोमल चरणांवर सोपवले म्हणजे तुम्हीच या देहात प्राण भरलात ना ? तुम्ही हे कधी मान्य करणार नाही. भगवंत कसे म्हणणार की, मी भगवंत आहे; पण आता महर्षींमुळे हे रहस्य सगळ्यांना ठाऊक झाले आहे. काही चुकले असेल, तर क्षमा करा. कृपाळू गुरुमाऊली, तूच श्रीमत् नारायण आहेस. तूच आम्हा सर्व साधकांचे रक्षण करत आहेस. आम्हा सर्व साधकांना मोक्षाकडे घेऊन जाण्यासाठी कितीतरी कष्ट घेत आहेस. आम्हाला प्रत्येक क्षणी कृतज्ञताभावात रहाता येऊन, अखंड साधनारत रहाता येऊन तुला अपेक्षित अशी साधना करता येऊन तुझी कृपादृष्टी अखंड अनुभवता येऊ दे’, अशी तुझ्या पावन चरणी प्रार्थना आहे.’
- कु. दीपाली मतकर, सोलापूर
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn