Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विवाह झालेली व्यक्ती ही अविवाहितांपेक्षा अधिक निरोगी असते ! - संशोधनाचा निष्कर्ष

     मुंबई - विवाह झालेली व्यक्ती ही अविवाहितांपेक्षा अधिक निरोगी रहात असून आजारांपासून चार हात लांबच असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. 
१. या संशोधनानुसार अधिकाधिक अविवाहित मंडळी ही मधुमेह, उच्च रक्तदाब, पचनसंस्थेशी संबंधित आजार, स्थूलपणा अशा अनेक तक्रारींनी ग्रासलेले आढळले. तेच विवाह झालेल्या व्यक्तींचे आजार अक्षरशः नाहीच्या बरोबरीस निघाले. 
२. संशोधन करणारे योकोहामा सिटी विश्‍वविद्यालयातील अध्यापक योशिनोबु कोंडो यांच्या मते, विवाहितांमध्ये वजन वाढण्याचा धोका ५० टक्क्यांहून अल्प असतो, तसेच पचनाशी निगडित आजारही ५८ टक्के दूर लांब असतात.
३. विवाह झालेली व्यक्ती उत्तम भोजन आणि स्वतःकडे लक्ष देण्याविषयी अधिक गंभीर असतात. 
४. संसारी व्यक्ती क्रियाशील असते आणि हातातील प्रत्येक काम ते तत्परतेने आणि वेळेत संपवतात; परंतु अविवाहित व्यक्तींचा दिनक्रम विस्कटलेला असतो आणि त्यात कोणतेही नियोजन नसते. त्यांचे आरोग्याच्या नाना तक्रारींमुळे वजनही वाढते.
५. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो अधिकाधिक माणसांमध्ये आणि प्रियजनांसह राहत असेल, तर त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम असते. मन आनंदित असल्यास ते शरीरावर चांगला परिणाम करते. त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासह प्रिय व्यक्ती असल्यानेही ते निरोगी रहातात, असेही या संशोधनात आढळून आले आहे.
६. ज्यांना माणसांमध्ये रहाण्याची सवय असते, ते त्यांची समस्या चुटकीसरशी सोडवतात आणि त्यांना साहाय्य करण्यासाठी अनेकजण सिद्ध असतात. अधिकाधिक लोकांमध्ये रमणे हीच गोष्ट मानिसक आनंद देते.
७. या संशोधनासाठी २३० लोकांच्या आरोग्याचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn