Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सेवेत रुजू न होणार्‍या आधुनिक वैद्यांवर दोन मासांत कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्‍वासन

        नागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत सांगितले की, राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही चालू आहे. दीर्घ रजेवर गेलेले राज्यभरात अशा प्रकारचे ४९७ आधुनिक वैद्य आहेत. त्यांपैकी ९९ आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. येत्या २ मासांत उर्वरित आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात येईल.
     या संदर्भात आमदार श्रीमती ज्योती कलानी प्रश्‍न उपस्थित करतांना म्हणाल्या होत्या की, सध्या उल्हासनगर येथील शासकीय प्रसूतीगहात स्त्रीरोगतज्ञांची पदे रिक्त असल्याने गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून या रुग्णालयांतील खाटांची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंत वाढवली आहे; मात्र तेथील महिला आधुनिक वैद्य ३ वर्षांपासून अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था राज्यातील शासकीय रुग्णालयांची असून शासन याविषयी कोणती कार्यवाही करणार ? (आधुनिक वैद्यांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. एखादा आधुनिक वैद्य दीर्घकाळ रजेवर गेल्यानंतर केवळ नोटीस पाठवून हा प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी नवीन आधुनिक वैद्यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी शासन काही प्रयत्न करणार आहे कि नाही ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn