Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इस्लामिक बँक उघडण्यापूर्वीच बंद !

संपादकीय
     रिझर्व्ह बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयाला देशातील बँकांमध्ये इस्लामिक बँकेची एक खिडकी उघडण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला होता; मात्र तो सरकारने अनावश्यक असल्याचे सांगत फेटाळला. या खिडकीमुळे मुसलमानांकडील पैसा बँकेत बिनव्याजी जमा होईल आणि तो देशाच्या मुख्य आर्थिक प्रवाहात वापरता येईल, असा रिझर्व्ह बँकेचा विचार होता; मात्र बहुसंख्य हिंदूंच्या देशात इस्लामिक बँकिंग कशाला, यावरून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केल्याने सरकारला हा प्रस्ताव फेटाळणे भाग पडले; मात्र तसे स्पष्टपणे सांगणे निधर्मी सरकारला सोयीचे नव्हते त्यामुळे सर्वसमावेशक आर्थिक धोरण स्वीकारल्याने या योजनेची आवश्यकता नाही, असे सरकारने म्हटले. सरकारने काहीही कारणे दिली, तरी हा हिंदूंच्या विरोधाचाच विजय आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही तज्ञांकडून असेही सूत्र मांडण्यात येते की, मुसलमानांना व्याज घेणे हराम असल्याने ते बँकेत पैसे जमा करत नाही; मात्र या धार्मिक नियमांच्या आधारे मुसलमान त्यांच्याकडील पैसा जाणीवपूर्वक देशाच्या प्रवाहात आणत नाहीत. तसेच याद्वारे काही धर्मांध राष्ट्रविरोधी कारवायांसाठी, उदा. हवाला व्यवहार, आतंकवाद्यांना, मदरशांना आणि मशिदींना पैसे पुरवतात, असे म्हटले जाते. यात किती तथ्य आहे, याचा सरकारने शोध घेतला पाहिजे; मात्र यावर इस्लामिक बँक हाच पर्याय नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn