Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन !

      रायगड - ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशा आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु
(डावीकडे) यांना निवेदन देतांना कार्यकर्त्या

पनवेल
     येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनील बाजारे आणि नायब तहसीलदार सौ. कल्याणी कदम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाड
     येथे पोलीस ठाणे आणि तहसीलदार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. धनाजी गुरव यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत महाड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते श्री. अजय मांगडे हेही उपस्थित होते.
पेण
     येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कळंबोली येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पोपेरे आणि के.एल्.ई महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन दिले.
प्राचार्यांना विषय आवडल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन करण्याची मागणी केली. मार्गदर्शनाचा ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. येथे तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगदाळेसाहेब यांनाही निवेदन देण्यात आले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn