Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण ! - श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

४ सहस्र ४३४ हिंदूंनी अनुभवली ऑनलाईन सभा !
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती !
श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल
     नालासोपारा (जिल्हा पालघर), १३ डिसेंबर (वार्ता.) - आज ‘इसिस’च्या माध्यमातून इस्लामी आतंकवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण आहे. सहस्रो वर्षांचा इतिहास सांगतो की, हिंदू हा सामर्थ्यशाली असतांनाही त्याने कधीही कोणावर स्वत:हून आक्रमण केले नाही; कारण विस्तारवाद हा हिंदूंचा स्वभाव नसून साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे हा हिंदूंचा स्वभावधर्म आहे. आज मात्र हिंदूंच्या या मूलभूत अधिकारावरच संकट आले आहे. आज ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’, समलैंगिकता, हिंदूंच्या सणांच्या विरोधातील याचिका यांवर त्वरित निकाल देण्यात येतात; मात्र हिंदु संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांवरील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जातात. हे सर्व रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि हिंदूंनी त्यासाठी संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
     नालासोपारा आणि वसई या परिसरात होत असलेले हिंदूंचे धर्मांतर, हिंदु महिला अन् युवती यांवरील अत्याचार, ‘लव्ह जिहाद’, गुन्हेगारी, आतंकवादाचा धोका आदी विविध समस्यांमुळे येथील हिंदू ग्रासलेले आहेत. हिंदु बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि हिंदूंना संघटित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आलेे होते. पालघर जिल्ह्यातील तिसरी हिंदु धर्मजागृती सभा विद्या वारिधी महाविद्यालयाच्या पटांगणात ११ डिसेंबर या दिवशी पार पडली. या धर्मसभेत ‘सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर या वक्त्यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित करून त्यांच्यातील धर्मतेज जागवले. या सभेला सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. 
    या वेळी विद्या वारिधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस्.पी. सिंह आणि अवधूत भगवान राम विद्यालयाचे संस्थापक श्री. सुरेंद्र यादव हे मान्यवरही उपस्थित होते. सभेत श्री बजरंग सेवा दल, योग वेदांत समिती, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ४०० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. ४ सहस्र ४३४ जणांपर्यंत फेसबूकच्या माध्यमातून सभेचा विषय पोचवण्यात आला. धर्मसभेचा प्रारंभ शंखनाद, वेदमंत्रपठण आणि दीपप्रज्वलन यांनी झाला. सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत वैती यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सूत्रसंचालन श्री. दिप्तेश पाटील यांनी केले. 
हिंदूंची झालेली दु:स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय ! 
- श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती
श्री. सुमित सागवेकर
     देशातील मशिदींच्या व्यवस्थापनासाठी मुसलमानांचा ‘वक्फ बोर्ड’ आहे. ख्रिस्त्यांच्या चर्चच्या व्यवस्थापनासाठी ‘डायोसेशन सोसायटी’ आहे, तर हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे का नाही ? शासनाने हिंदूंच्या मंदिरांवर स्वत:चे नियंत्रण ठेवले आहे; मात्र एकही मशीद किंवा चर्च यांवर स्वत:चे नियंत्रण ठेवले नाही. आज मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांना देण्यात येत आहे. हिंदूंच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे सरकार मशिदींवरील भोग्यांवर न्यायालयाचा आदेश असतांना असतांनाही कारवाई करण्यास टाळाटाळ करते. आज हिंदूंची झालेली दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे हाच एकमेव उपाय आहे.
संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्याची आवश्यकता ! 
- सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था
 सौ. नयना भगत
      शौर्याने ओतप्रोत भरलेला आपला इतिहास आहे; मात्र हे आपल्याला शिकवले जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून ‘इसिस’ आणि आतंकवाद यांचे संकट आपल्यासमोर आहे. धर्मांधांकडून भारतात चालवण्यात येणारा ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, ‘फिल्मी जिहाद’ त्यांची भयानकता स्पष्ट करते. हे सर्व रोखण्यासाठी प्रत्येक हिंदूने स्वत:मध्ये क्षात्रतेज जागवले पाहिजे. संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंमध्ये शौर्यजागरण करण्याची आवश्यकता आहे. क्षात्रतेजाला साधनेची जोड द्यायला हवी. आपल्या राष्ट्रवीरांनी प्रतिकूल परिस्थितीत इतिहास घडवला, त्यातून आपण बोध घ्यायला हवा. 
क्षणचित्रे
१. वक्त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना उपस्थित धर्माभिमानी उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते. 
२. सभेनंतर झालेल्या गटचर्चेत अनेक धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि बालसंस्कारवर्ग यांविषयी जाणून घेतले, तसेच ते चालू करण्याची मागणी केली.
३. गटचर्चा चालू असतांना एका धर्माभिमान्यांनी ‘हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांना जातो’, याची खंत व्यक्त केली. या वेळी बोलतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ‘हिंदूंना संस्कृतचे ज्ञान देणारी पाठशाळा निर्माण व्हायला हवी’, असे विचार त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या बोलण्यातून धर्माप्रतीची तळमळ आणि आत्मीयता व्यक्त होत होती.
विशेष सहकार्य
१. ‘विद्या वारिधी महाविद्यालय ट्रस्ट’ने या सभेसाठी पटांगण विनामूल्य उपलब्ध करून दिले.
२. ‘आेंकार मंडप डेकोरेटसर्’चे श्री. भाई पाटील यांचेही या सभेला उत्तम सहकार्य लाभले.
श्री ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी सनातनच्या रामनाथी, 
गोवा येथील आश्रमाविषयी काढलेले गौरवोद्गार !
     सनातन संस्थेचे रामनाथी आश्रम हे हिंदु राष्ट्राचे मुख्यालय असेल. रामनाथी आश्रम हा हिंदूंचा पवित्र आश्रम आहे. येथील साधकांच्या अनुशासित जीवनाने मी प्रभावीत झालो आहे. असे जीवन जगल्यास आपले जीवनही आनंदी होईल.
धर्मकार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी आढावा बैठक !
स्थळ : विद्या वारिधि महाविद्यालय, संतोष भुवन, वालई पाडा मार्ग, नालासोपारा (पू.) 
बुधवार, १४ डिसेंबर २०१६, सायंकाळी ७.३० वा. 
संपर्क : ९५५२४०२९९९/९९२०२०८९५८

धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn