Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

देहलीमध्ये २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार !

गाडीवर लावण्यात आला होता गृहमंत्रालयाचा स्टीकर !
बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा मिळत नसल्याचा परिणाम ! काँग्रेसच्या काळात
देहलीत बलात्कार होत होते, ते आताच्या सरकारच्या काळातही होत आहेत; मग पालटले काय ?
      नवी देहली - देहलीत एका २० वर्षांच्या तरुणीवर चारचाकी गाडीमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बलात्कार्‍याला अटक केली आहे. विशेष म्हणजे या गाडीवर गृहमंत्रालयाचा स्टीकर लावलेला आढळून आला आहे.
      पीडित तरुणी नोएडा येथील रहिवासी आहे. १४ डिसेंबरला ती नोकरीच्या शोधात देहलीला आली होती. रात्री नऊच्या सुमारास घरी परतण्यासाठी ती एम्स् रुग्णालयाजवळ बसची वाट पहात उभी होती. त्याचवेळी एक चारचाकी गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. गाडी चालकाने रात्र झाली आहे, असे सांगून तिला नोएडा येथे सोडतो, असे सांगितले. घरी लवकर पोहोचेल, असे समजून ती तरुणी गाडीमध्ये बसली. त्यानंतर गाडीचालक बराच वेळ तिला देहलीच्या रस्त्यांवर फिरवत राहिला. रात्री ११ च्या सुमारास चालकाने मोतीबाग परिसरात गाडी थांबवली आणि तरुणीची छेड काढण्यास प्रारंभ केला. त्यानंतर धमकावून तिच्यावर बलात्कार केला. तरुणी कशीबशी त्याच्या तावडीतून निसटली. तिने पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी चालकाला त्याच्या मित्राच्या घरातून अटक केली. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn