Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नोटाबंदीनंतर आतापर्यंत ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये अधिकोषांत जमा !

चलनातील काळा पैसा 
नष्ट होण्यावर तज्ञांना शंका !
        नवी देहली - ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा रहित झाल्यानंतर ३ डिसेंबरपर्यंत अधिकोषांमध्ये ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये जमा झाले आहेत. ही सर्व रक्कम ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. जुन्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपणार आहे. 
        नोटाबंदीनंतर व्यवहारात असलेल्या १४ लाख ६० कोटी रुपयांच्या अधिक मूल्यांच्या नोटांपैकी १० टक्के रक्कमही म्हणजे सुमारे ३ लाख कोटी रुपये रक्कम बँकेत येणार नसल्याचे सांगितले जात होते; मात्र ३० डिसेंबरपूर्वीच बँकांमध्ये ९ लाख ८५ सहस्र कोटी रुपये जमा झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे; कारण चलनातून पूर्णपणे नोटा रहित करण्यास अद्याप २७ दिवस बाकी आहेत. या दिवसांत उर्वरित साडेचार लाख कोटी रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे काळा पैसा फिरवण्याच्या अनेक वाटा तातडीने रोखल्या नाहीत, तर बराचसा काळा पैसा हुशारीने पांढरा केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीती केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अधिकारी व्यक्त करत आहेत.
जनधन खात्याद्वारे काळा पैसा पांढरा !
        अनेक बँकांनी आधारकार्डच्या आधारे जनधन खाती चालू केली होती. या खात्यांमध्ये नियमानुसार ५० सहस्र रुपये ठेवण्यासाठी पॅनकार्ड क्रमांक देण्याची सक्ती आहे; मात्र अल्प रक्कम ठेवण्याला पॅनकार्डचे बंधन नाही. नेमक्या याच नियमाचा लाभ घेऊन अनेकांनी झटपट घरातील नोकर आणि माहितीतल्या गरिबांच्या नावावर जनधन खात्यांमध्ये प्रत्येकी ४९ सहस्र रुपयांपर्यंतची रक्कम ठेवली आहे. हे पैसे ठेवण्याच्या बदल्यात आधीच पुढील तारखेचे धनादेश घेऊन अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याची व्यवस्था केली आहे.
        या खात्यांच्या संख्या पहाता त्यांच्या व्यवहारांची चौकशी करणे कठीण आहे. रिझर्व्ह बँकेने जनधन खात्यामधून अधिकाधिक १० सहस्र रुपये काढण्याची मर्यादा घातली आहे; मात्र या नियमाने प्रश्‍न पूर्णपणे सुटणार नाही, असे जाणकार सांगत आहेत. 
        वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सोन्याचा मोठा व्यापार, भूमी खरेदी-विक्रीचे व्यवहार, बांधकाम उद्योग यांच्या व्यवहारांवर नियंत्रण मिळवले नाही, तर काळा पैसा शोधून काढण्याची मोहीम यशस्वी होणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे आहे. (यावरून सरकारने काळा पैसा नष्ट करण्याच्या संदर्भात नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी या सूत्रांवर विचार केला नाही, असेच लक्षात येते. अशा योजना परिणामकारकपणे न राबवणारे सरकार मूळ उद्देशात सफल कसे होणार ? - संपादक)
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn