Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आज जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत प्रखर हिंदुत्वाची तोफ धडाडणार !

  • जळगावच्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !
  • सभा संपन्न होणार्‍या शिवतीर्थ मैदानावर सभेच्या सिद्धतेस वेग
     जळगाव, २४ डिसेंबर (वार्ता.) - जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर २५ डिसेंबर या दिवशी प्रचंड उत्साहात संपन्न होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यांत सर्वत्र सभेविषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. या धर्मसभेत प्रमुख वक्त्यांच्या जाज्ज्वल्य अशा मार्गदर्शनाची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे जळगाववासियांना हिंदु राष्ट्र स्थापनेची पुढील दिशाच मिळणार आहे.      धर्मजागृती सभेच्या निमित्ताने जिल्ह्यांत सर्वत्र चालू असलेल्या प्रसारात रिक्शांवर ध्वनीक्षेपक आणि सायकलवर मेगाफोन लावून सभेचे निमंत्रण देणे, घरोघरी प्रसार करणे अशा विविध माध्यमांतून सभेला उपस्थित रहाण्याचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. याचसमवेत सामाजिक संकेतस्थळांद्वारे सभेला धर्माभिमान्यांनी उपस्थित रहावे, यांसाठी विविध पोस्ट आणि ध्वनिचित्रफिती यांद्वारेही लक्षावधी लोकांपर्यंत निमंत्रण केले जात आहे. 
धर्मजागृती सभेस एक हिंदु म्हणून अधिकाधिक संख्येने उपस्थित रहा ! - आमदार श्री. राजासिंह ठाकूर
     सध्या हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद असे अनेक आघात होत आहेत. या आघातांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकमात्र उपाय आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र होणे आवश्यक असून यास्तव जळगावमध्ये जाहीर धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. तरी या धर्मजागृती सभेस एक हिंदु म्हणून अधिकाधिक संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले आहे.
     मुसलमान अतिरेकी पाकिस्तानहून सहस्रो मैल प्रवास करून भारतात येऊन धर्मासाठी बलीदान करतात. आपण हिंदु म्हणून आपल्या धर्मासाठी केवळ काही किलोमीटर प्रवास करून निदान हिंदूंच्या धर्मसभेसाठी उपस्थित राहूया ! - श्री. शिवाजी वटकर, हिंदु जनजागृती समिती
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn